Devendra Fadanvis Esakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadanvis: अजित पवार- शरद पवारांच्या गुप्त बैठकीवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले,'या भेटीबाबत मला...'

पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये अजित पवारांनी घेतली शरद पवारांची गुप्त भेट झाल्याच्या चर्चा

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या राजकारणात काल पुन्हा एकदा अजित पवार शरद पवार चर्चेत आले. पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये चोरडिया यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतल्याचं समोर आलं. उद्योगपती चोरडिया यांच्या बंगल्यावर शरद पवार उपस्थित असताना अजित पवारही या बंगल्यावर जातानाचं दृष्य अनेक वृत्तवाहिन्यांच्या कॅमेरामध्ये कैद झाली. काका-पुतण्याच्या या गुप्त भेटीमुळे राजकीय चर्चांना मात्र उधाण आल्याचं दिसून आलं आहे.

त्यावर सत्ताधारी-विरोधक प्रतिक्रिया देत आहेत. ही भेट का झाली याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे, मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती सांभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी काका-पुतण्याच्या या गुप्त भेटीबाबत प्रश्न केला असता फडणवीस म्हणाले, 'त्यांच्या या भेटीबाबत मला काही माहिती नाही, त्याबाबतचा कोणताही तपशील माझ्याकडे नाही. भेट झाली, नाही झाली, किती वेळ झाली यासंदर्भातील कोणतीही माहिती माझ्याकडे नसल्याने मी तुमच्या ज्ञानामध्ये कोणतीही भर टाकू शकत नाही, मी त्याला सक्षम नाही', असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

तर पुण्याच्या चांदणी चौकातील प्रकल्पाचं काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन झालं. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. त्यानंतर अजित पवार हे कोरेगाव पार्कमधील चोरडिया यांच्या बंगल्यावर गेले. अजित पवार यांनी याच वेळी शरद पवारांची भेट घेतल्याचं समोर आलं आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे दुपारी उद्योगपती चोरडिया यांच्या बंगल्यावर होते. त्या ठिकाणी त्यांनी जेवणही केलं. शरद पवार यांच्यासोबत जयंत पाटीलही त्या ठिकाणी उपस्थित होते अशी चर्चा आहे. त्याचवेळी चांदणी चौकातील कार्यक्रम झाल्यानंतर अजित पवार हे सर्किट हाऊसवर न जाता दुसऱ्याच गाडीने चोरडिया यांच्या बंगल्यावर गेले. अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये यावेळी दीर्घ चर्चा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक खातात म्हणून विकतात, गुटखा विक्रेत्यांवर मकोका लावण्यावर मंत्र्यांचं अजब विधान; म्हणाले, अंगाशी येईल, कारवाईऐवजी....

Rahmanullah Gurbaz: गौतम गंभीरकडून घेतल्या टिप्स, अन् भारतीय गोलंदाजांवरच तुटून पडला; शतकानंतर गुरबाज म्हणाला...

Varya AI : भारताचं पहिलं AI व्हिडिओ टूल लाँच! फक्त टेक्स्ट टाकताच बनेल व्हिडिओ; पोस्ट करून कमवा हजारो रुपये, कसं वापरायचं? पाहा

Latest Live Updates Marathi: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची श्रीक्षेत्र भीमाशंकर भेट; विकास आराखड्याच्या कामांची पाहणी

Pune: केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या हस्तक्षेपामुळे ७५ अमरनाथ यात्रेकरूंचा मार्ग मोकळा; विमान रद्द झाल्यानंतर तातडीने उपलब्ध करून दिली पर्यायी व्यवस्था

SCROLL FOR NEXT