Devendra-Fadnavis-Uddhav-Thackeray e sakal
महाराष्ट्र बातम्या

'राज्यपालांना लिहिलेलं पत्र अपरिपक्वतेचं लक्षण'

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यपालांनी साकीनाका बलात्कार प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यपालांना पत्र लिहून सडेतोड उत्तर दिले आहे. त्यावरच आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री कार्यालयात काही सल्लागार आणि अधिकारी अपरिपक्व आहेत. मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारचे पत्र पाठविताना खातरजमा करावी, असा सल्ला फडणवीसांनी दिला आहे.

कोणत्याही पक्षाकडून राज्यपालांना मागण्यांचे पत्र मिळाल्यानंतर राजपाल सरकारला एक पत्र लिहितात. या पक्षाच्या अशा मागण्या आहेत, तुम्ही त्यावर काय कारवाई करणार? अशा विचारणा केली जाते. शक्ती कायद्यासाठी राज्यपालांनी विचारणा केली. राज्यपालांनी आदेश दिले नाहीत, तर त्यांनी सूचना केली आहे. मात्र, त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री कार्यालयाने अपरिपक्वता दाखविली. मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना आदेश महिला सुरक्षा अधिक कडक करण्याचे आदेश द्यायला पाहिजे होते. शक्ती कायद्यावर लवकर निर्णय करण्याचा विचार करू, असे म्हटले असते तर ते अधिक संवेदनशील दिसलं असतं. मात्र, राज्य सरकारकडून त्याला राजकीय रंग दिले गेले. मुख्यमंत्र्यांनी इतकं व्यक्त होणं हे पहिल्यांदा राज्यात घडलं.

काय होतं मुख्यमंत्र्यांचं पत्र?

महाराष्ट्राचे जुळे भावंड असलेल्या गुजरातशी आमचे एक भावनिक नाते आहे. पण गुजरात मॉडेलमध्ये महिला खरेच सुरक्षित आहेत काय? गुजरात पोलिसांच्या रिपोर्टनुसारच, रोज १४ महिलांवर बलात्कार, यौन शोषणसारख्या अत्याचारांचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही काळात अहमदाबादमधून २९०८ महिला बेपत्ता झाल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत गुजरातमधून १४ हजार २२९ महिला बेपत्ता झाल्या. २०१५ सालापासून गुजरातमध्ये महिलांवरील निर्घृण अत्याचारांनी टोक गाठले आहे. १७ एप्रिल २०२१ रोजी अहमदाबादमधून एका २५ वर्षांच्या महिलेस पळवून बलात्कार व हत्या करण्यात आली. या महिलेवर सामुदायिक बलात्कार केल्याचे पोस्टमार्टेम अहवालात सिद्ध झाले. मेहसाणा, राजकोट, वडोदरा, अहमदाबाद ग्रामीण, छोटा उदयपूर, सूरत ग्रामीण, जामनगर, पाटण भागातील महिलांवरील बलात्कार व अत्याचाराचे गुन्हे तसेच आकडे धक्कादायक आहेत. आकडे सांगतात, गुजरातमध्ये रोज ३ बलात्काराच्या घटना घडतात. यावर चर्चा करायची म्हटले तर गुजरात विधानसभेत एक महिन्याचे विशेष अधिवेशनच बोलावावे लागेल. साकीनाक्यातील घटनेने मा. राज्यपाल म्हणून आपण महिलांवरील अत्याचारांबाबत चिंता व्यक्त केली. हीच चिंता आम्हालाही आहेच. हा विषय साकीनाक्यापुरता मर्यादित नसून राष्ट्रव्यापी आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील पीडित महिला आपल्याकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. म्हणून राष्ट्रातील महिला अत्याचारांना तोंड फोडण्यासाठी संसदेचे चार दिवसांचे विशेष सत्र बोलवावे, अशी मागणी मा. राज्यपाल महोदयांनी पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहांकडे करावी. त्याच सत्रात साकीनाका घटनेवरही चर्चा करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Vidarbha News: भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार; जाम महामार्गावर नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकीने वाहनाला धडक

SCROLL FOR NEXT