Devendra Fadnavis  Google
महाराष्ट्र बातम्या

देवेंद्र फडणवीस UP चे उपमुख्यमंत्री? गुगलचा उडालाय गोंधळ

एवढ्या नाट्यमय संघर्षानंतर शाळेतल्या लहान मुलालाही देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याचं कळलंय

वैष्णवी कारंजकर

राज्यात साधारण महिन्याभरापूर्वीपासून अभूतपूर्व राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेतलं ऐतिहासिक बंड, भाजपासोबत शिंदे गटाची हातमिळवणी आणि अनपेक्षितपणे झालेला शपथविधी. या सगळ्यामध्ये चर्चा होती ती देवेंद्र फडणवीसांची. अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्री झालेल्या फडणवीसांची गुगलने एक वेगळीच ओळख करून दिली आहे.

मुख्यमंत्री होणारच असा ठाम विश्वास राज्याला असताना फडणवीसांनी आपण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करत आहोत आणि आपण त्यांना बाहेरून पाठिंबा देत असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत दिली. शपथविधीची वेळ ठरली. संध्याकाळी सात वाजता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होते. मात्र अवघ्या काही मिनिटांमध्ये डाव पलटला.

थेट भाजपाचे राष्ट्रीय नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आदेश आला आणि देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला लागली. अशा रितीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीसांची गुगलने एक वेगळीच ओळख करून दिलीये.

गुगल सर्च केलं असता, देवेंद्र फडणवीस हे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री असल्याची माहिती मिळत आहे. आता ही गुगलची चूक आहे का कोणीतरी खोडसाळपणा करून गुगलची दिशाभूल केलीय, ही बाबअद्याप गुलदस्त्यातच आहे. एवढ्या नाट्यमय संघर्षानंतर शाळेतल्या लहान मुलालाही देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याचं कळलंय, आता गुगललाही लवकर जाग यावी, हीच आशा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT