devendra fadnavis  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : दंगली होतील असं 'त्यांचं' वक्तव्य; फडणवीसांनी घेतला राष्ट्रवादीच्या नेत्याचा समाचार

संतोष कानडे

मुंबईः महाराष्ट्रात दंगली होतील, असं वक्तव्य करणं चुकीचं असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. हा समाजाचा आणि रामभक्ताचा अपमान असल्याचंही फडणवीस म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक विधान केलं होतं. ते म्हणाले होते की, दंगली घडवण्यासाठीच राम नवमी आणि हनुमान जयंती साजरी केली जाते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बोलतांना त्यांनी औरंगाबाद येथील दंगलीचा हवाला दिला होता.

हेही वाचाः संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

त्याला उत्तर देतांना आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांचं हे विधान आक्षेपार्ह आहे. लोकांमध्ये रामाविषयी आणि हनुमानाविषयी श्रद्धा आहे. दंगलीकरीता रामनवमी किंवा हनुमान जयंती साजरी केली जाते, असं म्हणणं म्हणजे भक्तांचा अपमान आहे.

ते पुढे म्हणाले की, नेत्यांनी महाराष्ट्रात दंगली होतील असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. अशा प्रकरणात काळजीपूर्वक बोललं आणि वागलं पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलंय.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी औरंगाबाद येथे उसळलेल्या दंगलीचा हवाला देत हनुमान जयंती आणि राम नवमी साजरी करण्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्य सरकारचा निर्णय! स्वस्त धान्य दुकानांत मिळणार रॉकेल; इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर तातडीने हाेणार वितरण..

Chhatrapati Sambhajinagar News: २०४ वर्षांची परंपरा जपणारी माळीवाड्यातील ‘काटेरी फास’ यात्रा; श्रद्धेचा थरार अनुभव

Datta Meghe Passes Away : विदर्भाचा बुलंद आवाज हरपला ! माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन, ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Guru Krupa importance: गुरुकृपा, श्रद्धेमुळे आध्यात्मिक प्रवास सुलभ; साधना करत अहंकार कमी करण्याचा श्री एम यांचा सल्ला!

आरोग्य विभागाचा निर्णय! राज्यात ७०० ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना; नगरसेवक होणार जनआरोग्य समितीचे अध्यक्ष, वाचा...

SCROLL FOR NEXT