Devendra Fadnavis sakal
महाराष्ट्र बातम्या

Kasba ByElection : कसब्यामध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून आला तर...; फडणवीसांनी उपस्थित केला प्रश्न

संतोष कानडे

पुणेः कसबा पेठ निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महत्वाचे नेते कसब्यामध्ये तळ ठोकून बसलेले आहेत. काही वेळापूर्वी कसब्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एका प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आसूड ओढला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजपचा कार्यकर्ता कसा असतो हे गिरीश बापट यांच्याकडे बघून लक्षात येईल. आजारी असतांनासुद्धा त्यांनी पक्षासाठी बैठक घेतली. त्यांच्या आवाहनावर आता आपल्याला ही निडणूक जिंकायची आहे.

विरोधकांनी या निवडणुकीमध्ये अनेक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला परंतु कसब्यातला मतदार हा हिंदुत्ववादी विचारांचा आहे. छत्रपती शिवरायांच्या पुण्यामध्ये देशभक्तांचा मेळा पहायला मिळतोय, असं फडणवीस म्हणाले.

पवारांच्या बैठकीमध्ये जातीयवादी टिपण्णी- फडणवीस

शरद पवार यांनी काल बैठक घेतली. त्यांच्या बैठकीमध्ये एक नेता म्हणतो, मोदींना आणि आरएसएसला हरवण्याकरीता देशभरातील मुसलमान आणू, मेलेला मुसलमानही येईल, असं जातीयवादी विधान पवारांच्या बैठकीत झाल्याचं फडणवीस म्हणाले.

काँग्रेसचा उमेदवार निवडून येणारच नाही. पण जर तो उमेदवार निवडून आला तर पुण्यश्वर महादेवाबद्दल त्यांची भूमिका काय असेल? हे स्पष्ट करावं, असं आवाहन फडणवीसांनी केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT