Devendra Fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

गुप्तचर विभागातील महत्त्वाची माहिती फडणवीसांकडे; अडचणीत होणार वाढ

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण फडणवीसांना राज्य गुप्तर विभागाने महत्त्वाची माहिती दिली असल्याचं सांगण्यात आलंय. रश्मी शुक्ला या त्या वेळच्या गुप्तचर विभागाच्या अधिकारी होत्या. फडणवीसांना चार वेळा बोलावूनही ते हजर राहिले नाहीत, अशी माहिती मुंबई सायबर शाखेच्या (Mumbai Cyber Cell) वकिलांनी दिली आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की, मला सायबर सेलने चौकशीसाठी बोलाविलेले नाही. त्यांच्याकडून एक प्रश्नावली प्राप्त झाली. त्यानंतर एक पत्र सुद्धा प्राप्त झाले.त्यावर योग्य वेळी बोलीन, असे मी सांगितले आहे. न्यायालयातील प्रकरणानंतर त्यावर मी बोलेनच. विरोधी पक्षनेता म्हणून भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर काढण्याचा माझा अधिकार आहेच आणि यासाठी माहिती कुठून मिळाली, हे विचारण्याचा सरकारला अधिकार नाही.

काय आहे नेमकं प्रकरण?

SID ऑफिस मधून गोपनिय माहिती देवेंद्र फडणवीसांकडे कशी आली, याचा तपास मुंबई सायबर सेल करत आहे. इतकी गोपनिय माहिती कशी लीक झाली, असा प्रश्न आहे. फोन टँपिंग प्रकरणात मुंबई सायबर सेलच्या वकिलाने आज न्यायालयात सांगितलंय की, एका अज्ञात व्यक्तीने राज्य SID च्या कार्यालयातून (जेव्हा SID प्रमुख रश्मी शुक्ला होत्या) गोपनीय डेटा चोरला आणि तो विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिला होता. आम्हाला तो डेटा हवा आहे जेणेकरून आम्ही हा तपास योग्य निष्कर्षापर्यंत नेऊ शकू.

पुढे वकिलांनी म्हटलयं की, या प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची साक्ष महत्त्वाची आहे. देवेंद्र फडवणीस हे आमचे महत्वाचे साक्षीदार असून त्यांना आम्ही त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी चार वेळा फोन केला पण ते आले नाहीत. या प्रकरणी फडणवीस यांनी तपासयंत्रणेकडे वेळ मागितला आहे. मुख्य दंडाधिकारी न्यायालयात हे प्रकरण सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panshet Flood Affected : पुण्यातील ६० हजार विस्थापित नागरिकांच्या जमिनीचा प्रश्न अखेर सुटला; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

IND vs ZIM: 'आयर्लंडने डोळे उघडले' झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेपूर्वी कॅप्टन श्रेयस अय्यरचे मोठे वक्तव्य; म्हणाला, युवा खेळाडूंनी...

Stray Dog Attack : सहा महिन्याच्या झोपलेल्या मुलावर भटक्या कुत्र्याचा हल्ला; मुलगा गंभीर जखमी

Live Updates Marathi: पेपरफुटीच्या मुद्द्यावर सभागृहातच चर्चा आवश्यक- जेपी नड्डा

FDA Crime : अस्वच्छतेमुळे १० हॉटेल, बेकरींचे परवाने निलंबित

SCROLL FOR NEXT