महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : ''बदलीच्या निर्णयात फडणवीसांचा दोष नाही, पण...'', दीपक केसरकरांनी दिलं स्पष्टीकरण

संतोष कानडे

मुंबईः जालन्याच्या सराटी अंतरवाली गावामध्ये पोलिसांनी तुफान लाठीहल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये अनेक आंदोलक जखमी झाले होते. शिवाय पोलिसदेखील जखमी झाले होते. या प्रकरणी सरकार स्तरावरुन कार्यवाही सुरु असताना पोलिस अधीक्षकांची बदली करणं योग्य नाही, अशी भूमिका मंत्री दीपक केसरकर यांनी मांडली आहे.

दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहून तुषार दोशींच्या बदलीला स्थगिती देण्याची मागणी केली. 'एबीपी माझा'शी बोलताना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले की, चौकशी सुरु असलेल्या अधिकाऱ्याची बदली केल्यास चुकीचा मेसेज जाईल. मराठा लाठीहल्ला प्रकरण शांत होण्यापूर्वीच त्यांना पोस्टींग देणं चुकीचं ठरेल. पोस्टींग मिळेपर्यंत अधिकाऱ्याला मुख्यालयाला ठेवता येतं, त्यामुळे या बदलीला स्थगिती देण्याची माझी मागणी आहे.

केसरकर पुढे म्हणाले, माझी बाजू मी मुख्यमंत्री महोदयांना सांगितली आहे. बदली थांबवण्याची मागणी केलीय. मराठा समाजाच्या मनामध्ये वेगळी भावना निर्माण होऊ शकते. महाराष्ट्राला आज शांततेची आणि सलोख्याची गरज आहे. आम्ही सरकार म्हणून एक आहोत, जनतेच्या हिताचं जे आहे तेच आम्ही करणार आहोत.

फडणवीसांबद्दल बोलताना केसरकर म्हणाले, फक्त नियमांकडे बघून महाराष्ट्राची शांतता भंग करता येणार नाही. तुषार दोशी यांच्या बदलीमागे देवेंद्र फडणवीसांचा काहीही संबंध नाही. डिपार्टमेंटने यासंदर्भात निर्णय घेतलेला आहे. फडणवीसांचा याच्यामध्ये काही दोष नाही, असं म्हणत त्यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

तो आला आणि माझं आयुष्यच बदललं! रिंकू राजगुरूने दिली प्रेमाची कबुली; शेअर केला तिच्या रोमिओचा फोटो

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

SCROLL FOR NEXT