Uddhav Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray: "उद्धव ठाकरे ज्या गोष्टी कॅमेरातून टिपतात त्या गोष्टी मी..."; फडणवीसांचा 'त्या' फोटोवरुन टोमणा

Sandip Kapde

Uddhav Thackeray: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जहांगीर आर्ट गॅलरीला भेट दिली. फडणवीस म्हणाले, डॉ. रमाकांत पांडा हार्ट सर्जन आहेत, त्याप्रमाणेच ते सिद्ध हस्त फोटोग्राफर आहेत.  मी जहांगीर आर्ट गॅलरीतील फोटो पाहून आश्चर्यचकित झालो. निसर्गाचं वैविध्य आणि प्राण्यांचे विविधांगाने छायाचित्रण केलं असल्याचे फडणवीस म्हणाले. यावेळी फडणवीस यांनी राजकीय टोले देखील लगावले आहेत.

यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी देखील जहांगीर आर्ट गॅलरीत भेट दिली होती. यावेळी कमळ सोतब वाघ असल्याच्या फोटोंवर त्यांनी मिश्किल टिप्पणी दिली होती. वाघ आणि कमळ या फोटोवर उद्धव ठाकरे यांनी जुन्या आठवणी बोलून दाखवल्या होत्या. "एकवेळ होती जेव्हा कमळ आणि वाघ सोबत होते", असं म्हणाले उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान तोच फोटो आज आज देवेंद्र फडणवीस यांनी देखील काही वेळ थांबून पाहिला. फोटो पाहिल्यावर फडणवीस म्हणाले की, "मी माझ्या नजरेतून पाहतो. ते (उद्धव ठाकरे) ज्या गोष्टी कॅमेरातून टिपतात, त्या गोष्टी आम्ही टप्प्यात आल्यावर टिपतो."

उद्धवजी स्वतः फोटोग्राफर आहेत मी सामान्य माणूस आहे. ते त्यांच्या नजरेतून पाहतात, मी माझ्या नजरेने पाहतोय. तर ज्या गोष्टी ते कमेरातून टिपतात, तशाच प्रकारे काही गोष्टी आम्हालाही टिपता येतात त्या आम्ही टप्प्यात आल्यावर टिपतो, असे फडणवीस म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

SCROLL FOR NEXT