Balasaheb Thackeray And Devendra Fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

आमचे देवेंद्र फडणवीस हे हिंदूहृदयसम्राट ; आमदार नितेश राणेंकडून उल्लेख

सकाळ डिजिटल टीम

शिर्डी - नवीन सरकार स्थापन झाल्यापासून हिंदुत्वाचा गजर सुरू झाला आहे. आम्ही किती कट्टर हिंदुत्ववादी आहोत हे सांगण्याचा सातत्याने प्रयत्न होतोय. आजपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच हिंदुहृदयसम्राट म्हणून परिचित होते. मात्र आता भाजप नेते नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच हिंदुहृदयसम्राट असल्याचं म्हटलं. ते शिर्डीत आयोजित आंदोलनात बोलत होते. (Devendra fadnavis news in Marathi)

नितेश राणे म्हणाले, महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडवट हिंदुत्ववादी आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमचे हिंदुहृदयसम्राट आहेत, हे अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं, असं नितेश यांनी म्हटलं.

दरम्यान हिंदुहृदयसम्राट म्हणून दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत. मात्र आता शिंदे यांनी अर्ध्यापेक्षा अधिक आमदार सोबत घेऊन वेगळी शिवसेना उभी केली आहे. तसेच त्यांनी भाजपसोबत जावून सरकार स्थापन केले. मात्र आता मित्र पक्षाच्या नेत्यानेच देवेंद्र फडणवीसांना हिंदुहृदयसम्राट म्हटलं आहे. हे शिंदे गटाला कितपत रुचणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.

दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना यावर काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. अद्याप शिवसेनेकडून यावर कोणती प्रतिक्रिया आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra local politics news : सदाभाऊ खोतांनी जयंत पाटलांची गावरान भाषेत खिल्ली उडवली, जिल्हा परिषद राजकारण तापलं

Bel Patra Benefits: महादेवाला प्रिय असलेल्या बेलपत्राचा असा करा वापर, सर्दी, खोकलासह हे 5 आजार राहतील दूर

Latest Marathi News Live Update : गुजरात उच्च न्यायालयाने आसाराम बापूची ४५,००० चौरस मीटर जमीन परत मिळविण्यासाठी राज्य सरकारच्या कारवाईला मान्यता दिली

Jaykumar Gore:औंधसह २१ गावांना तीन वर्षांत पाणी देणार: ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे; यापुढची निवडणूक पाणीप्रश्नावर होणार नाही!

Mumbai–Pune Expressway: ३२ तास रस्ता बंद, लोक रस्त्यावर अडकले… राज ठाकरेंनी मागितला टोल परतावा; सरकारच्या व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT