devendrs fadanvis sakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis: मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांचा कोल्हापूर दौरा रद्द, काय आहे कारण?

शिवसेनेकडून वृत्तपत्रात छापून आलेल्या एका जाहिरातीने राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.

धनश्री ओतारी

राज्यात सध्या शिवसेनेकडून वृत्तपत्रात छापून आलेल्या एका जाहिरातीने राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. कारण 'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे' अशी जाहिरात शिवसेनेकडून करण्यात आली. आतापर्यंत 'देशात नरेंद्र अन् राज्यात देवेंद्र' अशी जाहिरात पाहयला मिळाली आहे. त्यामुळे राज्यात चांगलेच घमसाम माजले आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूर दौरा रद्द झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Devendra Fadnavis' Kolhapur tour cancelled maharashtra politics)

शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत. गेल्या आठवड्यात कोल्हापूर शहरात मोठा राडा झाला होता. त्यानंतर बरोबर एक आठवड्यानं मुख्यमंत्री शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. दरम्यान, फडणवीस कोल्हापूरला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. Devendra Fadnavis

म्हणून फडणवीसांचा कोल्हापूर दौरा रद्द

सायनसचा त्रास बळवल्याने फडणवीस यांनी दौरा रद्द केला आहे. शंभुराज देसाई यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत. 

कोल्हापुरातील दंगलीचे वातावरण आता थंडावले असले तरी राजकीय टीकाटिपणी सुरू आहे. जिल्ह्यातील उभय काँग्रेस, पुरोगामी पक्षांनी यावर बोलण्याचे टाळले आहे. तरी राष्ट्रवादीचे तरुण आमदार रोहित पवार हे मात्र (एकटेच) तातडीने दाखल झाले. ‘दंगल घडली की घडवली ?’ असा प्रश्न त्यांनी राज्यकर्त्यांना केला आहे. अशातच मुख्यमंत्री शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.Devendra Fadnavis

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT