devendra fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

देशाला काही संकुचित वृत्ती अधोगतीच्या मार्गावर नेत आहेत -फडणवीस

सकाळ डिजिटल टीम

पुणे : आज देश त्या मार्गानं चाललेला आहे. देशाला काही संकुचित वृत्ती अधोगतीच्या मार्गावर नेत आहेत. असा टोला नाव न घेता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (devendra fadnavis) विरोधकांना लगावला आहे. पुण्यातील सिंम्बोयसिस शिक्षण संस्थेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर (dr.babasaheb ambedkar) महापरिनिर्वाण दिनी (mahaparinirvan din) फडणवीसांनी भाषण केले. त्यावेळी ते बोलत होते.

इंदू मिलच्या जागेवर स्मारकाचे काम सुरु

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुण्यातील सिंम्बॉयसिस संस्थेच्या संग्रहालय आणि स्मारक येथील अभिवादन सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संबोधित केलं. ज्या महामानवाने देशाला संविधान दिल, त्या महामानावाच्या स्मारकासाठी चैत्यभूमीवर एक इंचही जागा मिळू नये हे दुर्दैव आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. रामदास आठवले यांना घेऊन नरेंद्र मोदींना भेटलो. तीन दिवसात 2300 कोटी रुपयांची जागा एकही रुपया न घेता ती जागा महाराष्ट्र शासनाकडं हस्तांतरीत केली. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं इंदू मिलच्या जागेवर ते काम सुरु आहे ते येत्या काळात पूर्ण होईल. चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांना त्याचं दर्शन घेता येईल, असं फडणवीस म्हणाले. आज देश त्या मार्गानं चाललेला आहे. मात्र, काही व्यक्ती संकुचित त्या मार्गावरुन देशाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

येत्या 10 वर्षात जगातील विकसित देश म्हणून विकसित

बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावर चालून येत्या 10 वर्षात जगातील विकसित देश म्हणून विकसित करु शकतो. देशासमोरील सर्व प्रश्नांचं उत्तर संविधानात आहे. संविधानात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यामुळं देश एक आहे. संधीची समानता या मुळं कोणी मागं राहणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. संविधानाच्या माध्यमातून शेवटच्या व्यक्तीला न्याय देता येईल, असं फडणवीस म्हणाले.

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. त्यानिमित्त मुंबईतील चैत्यभूमीवर (Chaitya Bhoomi) मोठ्या प्रमाणावर भीम सैनिक एकत्र येत असतात. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना माननाऱ्या राज्यासह देशभरातील लोकांचा समावेश असतो. यावेळी ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमिवर जास्त गर्दी न करण्याचं आणि कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करण्याचं आवाहन मुंबई महानगर पालिकेने केलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर आज चैत्यभूमीवर सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केलं.राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अनेक राजकीय मंडळी देखील या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज चैत्यभूमीवर येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना अभिवादन केलं आणि आमचं सरकार हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी काम करत असल्याचं सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT