Devendra Fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis: सीमावादाबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...'CM शिंदे

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर कर्नाटकला जशास ते उत्तर देण्याची तयारी महाराष्ट्राने केली होती

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर कर्नाटकला जशास ते उत्तर देण्याची तयारी महाराष्ट्राने केली होती. अशातच सीमा प्रश्नावर समन्वय साधण्यासाठी नेमण्यात आलेले समितीचे नेते चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई बेळगाव दौऱ्यावर जाणार होते. मात्र, अचानक दौरा रद्द झाला. त्यामुले राजकीय वर्तुळात चर्चेला उधाणा आलं आहे. या चर्चेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. (Devendra Fadnavis maharashtra karnataka border issue Chandrakant Patil And Shambhuraj Desai Cancelled Belgaum)

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर कर्नाटकला जशास ते उत्तर देण्याची तयारी महाराष्ट्राने केली होती. महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारने सीमा प्रश्नावर समन्वय साधण्यासाठी मंत्र्यांची समिती नेमलीय. या समितीत चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई आहेत. हे दोन्ही मंत्री उद्या बेळगावच्या दौऱ्यावर जाणार होते.

याबाबत गेल्या आठवड्यात त्यांनी जाहीर केलं होतं. पण मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सीमा भागात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने हा दौरा रद्द करावा, असं आवाहन कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलं. तसंच कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना मंत्र्यांचा दौरा रद्द करण्याची मागणी केली होती.

दरम्यान आता उपमुख्यमंत्री फडणवीसांनी यावर भाष्य केलं आहे.

हेही वाचा: First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

आम्हाला कर्नाटकात जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. सीमावादासंदर्भात सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईल. यासंदर्भात कर्नाटक आणि महाराष्ट्र निर्णय घेऊ शकत नाही. राज्याने अत्यंत ताकदीने कोर्टात आपली भूमिका मांडली आहे.

विनाकराण यासंदर्भात नव्या वाद सुरु करणं चुकीचे आहे. मंत्र्यांच्या हा दौरा महापरिनिर्वाण साठी होता. एका कार्यक्रमाल मंत्री जाणार होते. यासंदर्भात कर्नाटकच काही म्हणणं आहे. महाराष्ट्राच देखीलं म्हणणं आहे. मंत्र्यांनी ठरवलं तर त्यांना जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही. परंतू महापरिनिर्वाण दिनी आपण अशा प्रकारचा वाद तयार करयाचा का हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून काही ना काही विचार सुरू आहे.

आमच्यासाठी महापरिनिर्वाण दिन महत्त्वाचा आहे. आणि त्यादिवशी आंदोलन व्हाव, कोणत्याही प्रकारची घटना व्हावी, हे योग्य नाही.

आपल्याला भविष्यतही त्या ठिकाणी जाता येईल. जाण्यापासून कोणीही रोख शकत नाही. जाण्याला कोणाही घाबरत नाही. मला असं वाटतं की, स्वतंत्र्य भारताच्या कोणत्याही भागात कोणी कोणाला जाण्यापासून थांबवू शकत नाही. मात्र, महापरिनिर्वाण दिन असल्यामुळं काय करावं यासंदर्भात अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील. अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tragic Incident Kolhapur : कोल्हापूर जवळील प्रयाग चिखलीतील अवघ्या १५ वर्षीय मुलीनं उचललं टोकाचं पाऊल, आई वडील बाहेरगावी गेले अन्

Latest Marathi News Live Update :मला मारण्यासाठी अडीच कोटींची डील- मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

CA Success Story: आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करत ओंकार झाला ‘सीए’; आई-वडील, बहिणीच्या डाेळ्यातून आनंद अश्रू, संघर्षमय यशाचे कौतुक

Mahabharat War: कसं घडलं महाभारातातील युद्ध? AI LIVE रिपोर्टींग VIRAL, ५१४२ वर्षे मागे जाल, साक्षात कृष्ण-अर्जुन सर्वांना पाहाल

शतकीय खेळीनंतरही यशस्वी जैस्वाल संघाबाहेर, तर आयुष्य म्हात्रेला संधी; रणजी सामन्यासाठी मुंबईचा संघ जाहीर...

SCROLL FOR NEXT