devendra fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : 'त्या' पत्रकार परिषदेपूर्वी रश्मी वहिनींसमोरही केला बोलण्याचा सराव; फडणवीसांचा गौप्यस्फोट

संतोष कानडे

मुंबईः पोहरादेवी येथे दर्शन घेऊन उद्धव ठाकरेंनी विदर्भ दौरा सुरु केला होता. त्यावेळी बोलतांना त्यांनी पोहरादेवीची शपथ घेऊन अमित शाहांसोबत बंद दाराआड मुख्यमंत्रीपदाबाबत शब्द घेतल्याचं म्हटलं होतं. त्याला आज देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं आहे.

फडणवीस म्हणाले की, २०१९मध्ये उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. नंतर मी आतमध्ये गेलो आणि पत्रकार परिषदेत मला बोलायला सांगितलं. काय बोलायचं याची रिहर्सल एकदा मराठीत, मग हिंदीत झाली. त्यानंतर रश्मी ठाकरे आल्या. उद्धव ठाकरे म्हणाले वहिनींसमोर बोलून दाखवा. मग मी वहिनींसमोर तेच बोललो आणि बाहेर पत्रकारांना तंतोतंत तेच सांगितलं.

फडणवीस पुढे म्हणाले की, २०१९ मध्ये युतीचं बहुमत आलेलं होतं. परंतु तेव्हा त्यांनी बेईमानी केली आणि काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केला. अलिकडच्या काळात काही लोक शपथाही खोट्या घेत आहेत. पोहरादेवीला जाऊन शपथ घेतली, पण मनात त्यांनी माफी मागितली असेल आणि निश्चितपणे देवी त्यांना माफ करेल, असं ते म्हणाले.

पुढे बोलतांना फडणवीस म्हणाले, निकाल हाती आल्यानंतर युतीची बोलणी सुरु होती. ती सुरु असताना एका रात्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, हे सगळं जरी बरोबर असलं तरीही मी दोन दिवसांपूर्वी अमितभाईंशी बोललो होतो. मी त्यांना विनंती केली आहे की आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे. त्यानंतर मी रात्रीच अमितभाईंना फोन केला. त्यांनी मात्र मुख्यमंत्रीपद वाटलं जाणार नाही, कारण त्याचा फॉर्म्युला ठरलेला आहे, असं स्पष्ट सांगितलं.

नंतर मात्र उद्धव ठाकरेंनी युती शक्य नसल्याचं म्हणून आमचे दरवाजे उघडे असल्याचं एका पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यानंतर त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जावून सत्तास्थापन केली. त्यांनी भाजपशी, कार्यकर्त्यांशी आणि जनतेशी बेईमानी केली असून पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे कूटनीती करावीच लागेल, असे म्हणून फडणवीसांनी महाभारतातचे दृष्टांत दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT