Devendra Fadanvis  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadanvis: पोटनिवडणूकीचे उमेदवार ठरणार? देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठकीसाठी फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक आयोजित करण्यात आली आहे. याच बैठकीसाठी फडणवीस दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत. या निवडणूकीच्या दरम्यान पोटनिवडणूक उमेदवारांची निवड आणि रणनीती या विषय़ीच्या चर्चेची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीचे देवेंद्र फडणवीस सदस्य आहेत. तर या बैठकीत आगामी निवडणूकींची चर्चा होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. पंरतु पोटनिवडणूक आणि उमेदवार निवडीच्या रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या दिल्ली दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आगामी लोकसभा निवडणूकीसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. त्यासोबतच इतर पाच राज्यांच्या पोटनिवडणूका जाहीर झालेल्या आहेत. त्याच पार्श्वभुमीवर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने आज दिल्लीत बैठक बोलावली आहे. राज्यातुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार आहेत.

तर मुख्य कारण म्हणजे आगामी लोकसभा निवडणूकीसाठी राज्यात कशी तयारी करण्यात आली आहे. कशा पद्धतीने काम सुरू आहे. कशा प्रकारे जनतेपर्यंत पोहचले जात आहे. यासंबधीची माहिती या बैठकीत दिली जाण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणूका, मुंबई निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका यामध्ये भाजप कशी तयारी करते याची माहिती देण्याची शक्यता आहे.

तर राज्यात जे सत्ता समीकरण झालं. अजित पवार गट भाजप सोबत आला त्या गटामुळे किती फायदा होतो. याचा देखील या बैठकीत आढावा घेण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT