Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

''मी अधिकृतपणे सांगतो, मुख्यमंत्री बदलला जाणार नाही.. 'त्या' तारखांना विस्तार होईल?'' फडणवीस स्पष्ट बोलले

संतोष कानडे

मुंबईः राज्यामध्ये मुख्यमंत्री पदाची भाकरी फिरवली जाणार असल्याच्या चर्चा सुरु झालेल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या सगळ्या वावड्या असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे विरोधकांच्या दाव्यामध्ये किती तथ्य आहे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतय.

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करुन भाजपसोबत सत्तेत जाणं पसंत केलं. २ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी अचानक शपथ घेतली आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला. अजित पवार यांच्यासोबत ३५च्या पुढे आमदार असल्याचं सांगितलं जात आहे.

अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यामध्ये मुख्यमंत्री बदलला जाईल, असं बोललं जात आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेलं मुख्यमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे जाईल, अशी एक चर्चा मागच्या २० दिवसांपासून सुरु आहे. विरोधी पक्षातल्या नेत्यांनीही मुख्यमंत्री बदलाच्या वार्तांना खतपाणी घातलं आहे.

त्यातच परवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीवारी केली. त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे यांनी ही भेट सहकुटुंब घेतली. त्यामुळे पुन्हा त्यांच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल चर्चा सुरु झालेल्या आहेत.

या सगळ्या चर्चा म्हणजे वावड्या आहेत, असं आता देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. काही वेळापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी १० तारखेनंतर अजित पवार मुख्यमंत्री होतील, असं विधान केलं होतं. त्यावरही देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं केलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना उत्तर देतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काही लोक महायुतीतील नेत्यांच्या मनात संभ्रम संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र आमच्या मनामध्ये कसलाही संभ्रम नाही. अनेक नेते राजकीय भविष्य सांगत आहेत. परंतु त्यांचं काहीही खरं नाही. मी अधिकृतपणे सांगतो की, ९, १०, ११ तारखेला काहीही होणार नाही. झालंच काही तर आमचा विस्तार होईल. परंतु त्याची तारीख ठरली नाही. त्यामुळे आता समझदार को इशारा काफी हैं..

फडणवीस पुढे म्हणाले, प्रत्येकाने बोलतांना वास्तवाचं भान ठेवलं पाहिजे. महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. तेच राहणार आहे, हे तिन्ही नेत्यांना पक्कं माहिती आहे. त्यामुळे वावड्या उठवणं बंद करा, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : निलेश घायवळच्या अडचणी वाढणार? आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता...

Nanded Dasara: नांदेडमध्ये दसरा महोत्सव उत्साहात; हल्ला-महल्ला मिरवणुकीत हजारो शीख भाविकांचा सहभाग

Pune Crime : टीव्ही बंद करायला सांगितला म्हणून केली वडिलांची हत्या; ऐन सणाच्या दिवशी घडलेल्या घटनेने कोथरुड मध्ये खळबळ

Teacher Recruitment: मराठवाड्यात शिक्षकांसाठी सुवर्णसंधी! ४५७ समन्वयक पदांसाठी ऑनलाइन परीक्षा १ ते ५ डिसेंबर

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; आता E-kyc केलेल्या बहिणींनाच मिळणार लाभ, दिवाळीतील हप्ता पडणार लांबणीवर

SCROLL FOR NEXT