Devendra Fadnavis vs Sanjay Raut esakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : आता देवेंद्र फडणवीसही म्हणाले, कोण संजय राऊत? कर्नाटकातून खरमरीत टीका

संतोष कानडे

बंगळूरुः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत. कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरु आहेत. त्यावरही देवेंद्र फडणवीसांनी राज्यात भाजप सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

राज्यात रिफायनरी प्रकल्पाला विरोध होत आहे. त्यावर बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बारसुमधील रिफायनरी प्रकल्प हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. केंद्र सरकराच्या तीन ऑईल कंपन्या एकत्रित येवून गुंतवणूक करीत आहेत. हा ग्रीन रिफायनरी प्रकल्प असल्याने फळबागा किंवा मासेमारीवर काहीही परिणाम होणार नाही.

हेही वाचाः Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

काही लोक विकासाच्या प्रकल्पांना ठरवून विरोध करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचं अतोनात नुकसान होत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 'ते टीव्ही ९' या वाहिनीला मुलाखत देत होते. यावेळी त्यांना, संजय राऊतांच्या बेळगावच्या मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आला. बेळगावात जावून महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचार करा, यावर बोलतांना फडणवीस म्हणाले की, कोण संजय राऊत? ते काही राष्ट्रीय नेते नाहीत. असं म्हणून त्यांनी राऊतांना चिमटे काढले.

काही दिवसांपूर्वी नारायण राणे आणि अजित पवार यांनीही 'कोण संजय राऊत?' असं म्हणून चर्चेला तोंड फोडलं होतं.

...तर रिफायनरी दुसऱ्या राज्यात जाईल- फडणवीस

  • बारसुमधील रिफायनरी प्रकल्प देशातला सर्वात मोठा आहे

  • केंद्र सरकारच्या तीन ऑईल कंपन्या एकत्रित येऊन देशाच्या इतिहासात सर्वाच मोठी गुंतवणूक करत आहे

  • विरोध करणाऱ्यांची संख्या कमी आहे

  • ही ग्रीन रिफायनरी आहे. खोटं बोलून लोकांना संभ्रमित केलं जात आहे

  • मासेमारी अथवा फळपिकांवर याचा कुठलाही परिणाम होणार नाही

  • महाराष्ट्राचं अतोनात नुकसान होत आहे. कधी आरेला, कधी समृद्धी महामार्गाला विरोध केला जातो

  • गुजरातमध्ये रिफायनरीचा काहीही दुष्परिणाम झालेला नाही

  • आता जर रिफायनरी झाली नाही तर ती केरळ, गुजरात अथवा कर्नाटकात जाईल

'भावी मुख्यमंत्री' बॅनरवर काय म्हणाले फडणवीस?

  • नागपूरमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले

  • ज्या कोणी लावले त्यांनी काढून टाकावेत, मुर्खपणा करु नये

  • अतिउत्साही लोकं असतात, तेच असं करतात

  • एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, २०२४ मध्ये तेच मुख्यमंत्री असतील

  • त्यांच्याच नेतृत्वात आम्ही विधानसभा निवडणूक लढवू

  • कर्नाटकमध्ये भाजपला संपूर्ण बहुमत मिळेल

  • मोदीजींचा प्रभाव संपूर्ण देशात आहे

  • आपले मुख्यमंत्री मोदीजींसोबत काम करतायत, हे लोकांना माहिती आहे

  • डबल इंजिनचं सरकार येथे पुन्हा चांगलं काम करेल

  • भाजपने वेळोवेळी एक्झिट पोलचे आकडे खोटे ठरवलेले आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Navi Mumbai: रिल्स बनवण्यासाठी रेल्वेवर चढला, इतक्यात ओव्हरहेड वायरला चिटकला अन्...; क्षणात आयुष्य उद्ध्वस्त

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT