Devendra Fadnavis Sakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : काही लोक सकाळी ९ वाजता नशा करुन कुस्ती खेळतात; देवेंद्र फडणवीसांकडून राऊतांचा समाचार

सकाळ डिजिटल टीम

अहमदनगरः काही लोक सकाळी ९ वाजता नशा करुन कुस्ती खेळतात, असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना लगावला आहे. ते अहमदनगर येथे बोलत होते.

अहमदनगर येथे छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्ती स्पर्धेच्या समारोपला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची उपस्थिती होती. यावेळी फडणवीस यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली. 'काही लोक सकाळी नशा करून कुस्ती खेळतात, अशा शब्दात त्यांनी नाव न घेता संजय राऊत यांचा समाचार घेतला.

अहमदनगर येथील कुस्ती स्पर्धेचा मानकरी पैलवान महेंद्र गायकवाड हा ठरला. अंतिम कुस्तीमध्ये महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्यामध्ये लढत होत असताना शिवराज राक्षे यांच्या पायाला इजा झाल्याने महेंद्र गायकवाड याला विजयी घोषित करण्यात आले.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

राजकारणामध्ये अलीकडच्या काळामध्ये काही लोक सकाळी नऊ वाजता नशा करून कुस्ती खेळायचा प्रयत्न करतात. पण नशा केलेल्या पैलवानांना कुस्तीच्या बाहेरच राहावं लागतं. जे असली मातीचे पैलवान असतात, तेच कुस्त्या जिंकतात. तुमच्या आशीर्वादाने आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वात कुस्ती जिंकली आहे. 2024 ला पुन्हा जिंकू, तुमचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहू द्या, असे देवेद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT