Devendra Fadnavis  esakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : फडतूस प्रकरण! मी नागपूरचाय यापेक्षा खालची भाषा बोलता येते; लाळघोटे...

संतोष कानडे

मुंबईः राज्याला फडतूस गृहमंत्री लाभल्याचं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. त्याला गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जशास-तसं उत्तर दिलं आहे.

त्यांचा अडीच वर्षांचा कारभार बघितल्यानंतर नेमकं फडतूस कोण आहे, हे महाराष्ट्राला माहतंय. ज्यांनी दोन-दोन मंत्र्यांची लाळ घोटली, ज्यांनी वाझेची लाळ घोटली त्यांनी शब्द जपून वापरावेत. मी त्यांच्यापेक्षाही खालची भाषा वापरु शकतो..मी नागपूरचा आहे, असा इशाराचा फडणवीसांनी ठाकरेंना दिला.

फडणवीस पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरेंचा जो थयथयाट सुरुय त्याला मला उत्तर देण्याची गरज नाही. मोदींचे फोटो लावून निवडून येऊन खुर्चीसाठी लाळ घोटता, खरा फडतूस कोण आहे हे जनतेला माहिती असल्याचं ते म्हणाले.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

  • अडीच वर्षांचा कारभार बघितल्यानंतर नेमकं फडतूस कोणय? हे महाराष्ट्राला माहिती आहे

  • दोन-दोन मंत्री जेलमध्ये गेल्यानंतर राजीनामा घेऊ शकले नाहीत. त्यांच्याभोवतीच लाळ घोटत असतात

  • जे वाझेच्या मागे लाळ घोटतात, ज्यांच्या काळात पोलिस एक्स्टॉर्शन करतात त्यांना बोलण्याचा अधिकार काय?

  • अडीच वर्षे घरात बसून राजकारण करणाऱ्यांनी आम्हांला शिकवू नये

  • ज्या दिवशी बोलणं सुरु करील त्या दिवशी त्यांची पळता भूई थोडी होईल

  • त्यांचा जो थयथयाट आहे त्याला उत्तर देण्याचं कारण नाही

  • मोदींचे फोटो घेऊन निवडून येता आणि खुर्चीसाठी लाळ घोटता..मग खरा फडतूस कोण?

  • मला त्यांच्यापेक्षा खालची भाषा बोलता येते. मी नागपूरचा आहे

  • मी गृहमंत्री असल्याने अनेकांना अडचणी येताय. ते पाण्यात देव ठेवून बसले आहेत

  • पण मी गृहमंत्री पद सोडणार नाही. जो-जो चुकीचं काम करेल त्याला जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही

ठाण्यात शिंदे गटाच्या महिल्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या एका महिला कार्यकर्त्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटले. दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर टीका केली. महाराष्ट्राला फडतूस गृहमंत्री लाभले आहेत. असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर येत ठाकरेंना जशास-तसं उत्तर दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT