Devendra Fadnavis Sakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : मी यांच्या बापालाही घाबरत नाही; फडणवीसांची जीभ घसरली

सकाळ डिजिटल टीम

नाशिकः आगामी निवडणुकांसाठी भाजपने 'महाविजय २०२४' हा संकल्प केला आहे. नाशिकमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली.

नाशिकमध्ये समर्पण दिनानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, २०१४ पासून देशामध्ये सर्वसामान्यांचं सरकार आलेलं आहे. महाराष्ट्रानेही भाजपच सर्वात मोठा पक्ष असल्याचं सिद्ध केलं. त्यामुळे येत्या काळात सर्वसामान्यांची तळमळीनं कामं करा.

पुढे बोलतांना फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारचा मला जेलमध्ये टाकण्याचा प्लान होता. परंतु मी त्यांच्या बापालाही घाबरत नाही. ज्यांना मला जेलमध्ये टाकण्याची जबाबदारी दिली, तेच जेलमध्ये गेले.

फडणवीस नेमकं काय म्हणाले?

  • २०१४ पासून देशामध्ये सर्वसामान्यांचं सरकार आलं

  • भाजपने शत-प्रतिशत भाजपचा नारा याच भूमीमध्ये दिला होता

  • महाराष्ट्रातला पहिल्या क्रमांकाचा पक्ष भाजपच आहे, हे आता सिद्ध झालं आहे

  • 'महाविजय २०२४' हा भाजपचा नवा संकल्प आहे

  • लोकसभेसाठी मिशन- ४५, विधानसभेसाठी मिशन- २००; भाजप कार्यकारिणीमध्ये निर्णय

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आम्ही ट्वेंटी-२० ची बॅटिंग सुरु केली आहे

  • आमदार श्रीकांत भारतीय हे निवडणूक इन्चार्ज, बावनकुळे-फडणवीस यांची घोषणा

  • नाशिक येथे भाजपच्या वतीने समर्पण दिन साजरा करण्यात आला

  • मला काय मिळणार, याचा विचार न करता कार्यकर्त्यांनी लोकांची सेवा करावी

  • हे सरकार गद्दारांचं नसून खुद्दारांचं सरकार आहे. ज्यांनी २०१९ मध्ये पाठीत खंजीर खुपसलं ते गद्दार होते

  • हे सरकार बेकायदेशीर सरकार असं म्हणणारांनाच कायदा कळतो काय?

  • जे उरले-सुरले १०-१५ आहेत, तेही जातील म्हणून विरोधक घाबरले आहेत

  • सर्वोच्च न्यायालयात आपल्या बाजूने निकाल येईल, हा मला पूर्ण विश्वास आहे

  • मला जेलमध्ये टाकण्याचा यांचा प्लान होता. परंतु मी यांच्या बापाला घाबरत नाही.

  • मी त्यांना पुरुन उरलो. मला जेलमध्ये टाकण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे होती, ते जेलमध्ये गेले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT