Devendra Fadnavis on youtuber elvish yadav visit to CM eknath shinde varsha bungalow  
महाराष्ट्र बातम्या

Elvish Yadav : एल्विश यादव मुख्यमंत्री शिंदेंच्या बंगल्यावर कसा? विरोधकांच्या आरोपांवर फडणवीसांनी दिलं स्पष्टीकरण

एल्विश यादव विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

रोहित कणसे

प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादव हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावरील गणेशोत्सवात सहभागी झाला होता. दरम्यान नोएडा पोलिसांनी केलेल्या छापेमारीनंतर सापांची तस्करी, रेव्ह पार्टी आयोजित केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर महाराष्ट्रातील विरोधकी पक्षतील नेत्यांकडून मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका आणि आरोप केले जात आहेत. या चर्चेदरम्यान राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एल्विश यादव मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर कसा? याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्र्यांकडे गणेशोत्सव असतो तेव्हा वेगवेगळ्या सेलिब्रीटी येत असतात. त्यावेळी एल्विश यादव कुठलातरी रिअॅलिटी शो जिंकला होता. अशा अनेक सेलिब्रीटी येऊन जातात. ज्यावेळी तो येऊन गेला तेव्हा त्याच्यावर कुठला आरोप नव्हता. त्यावेळी तो एक सेलिब्रेटी म्हणून आला असेल, आता त्याच्यावर आरोप आहे असं म्हणून जर हिशोब करायला लागलो तर महाराष्ट्रातील अनेक पुढाऱ्यांना अडचणी होतील.

त्यामुळे काहीही वाटलं की मुख्यमंत्र्यांवर आरोप लावण्याचे धंदे चाललेत. हे वैफल्यग्रस्त धंदे उबाठाचे लोकं करत आहेत असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ड्रग्ज प्रकरणी कठोर कारवाई होणार

उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ड्रग्जच्या मुद्द्यावर केलेल्या आऱोपांना देखील फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. फडणवीस म्हणाले की, ड्रग्जच्या संबंधात गुंतलेल्या लोकांवर जेवढे कडक कायदे आहेत, ते सगळे लावण्यात येतील. आपण ड्रग्ज फ्री महाराष्ट्र अभियान सुरू केलं आहे. प्रत्येक जिल्ह्यात छापे टाकले जात आहेत, अशी माहिती देवेद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

अपराधी असणाऱ्यांवर तर कारवाई होईलच, जे पोलिस यामध्ये गुंतलेले असतील त्यांना फक्त सस्पेंड नाही तर ३११ प्रामाणे त्यांना डिसमीस केलं जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले. कुठल्याही पुराव्याशिवाय केलेले आरोप हे त्यांना काही अर्थ नसतो. अनेक वेळा ते घुमून फिरून आपल्याकडेच येतात. त्यामुळे राजकीय नेत्यांनी असे आरोप करु नयेत असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT