Devendra Fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : शरद पवारांनी भाकरी फिरवली? देवेंद्र फडणवीसांनी एका शब्दात सांगितले

Sandip Kapde

Devendra Fadnavis :   राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (१० जून) मोठे पाऊल उचलत सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षाचे कार्याध्यक्ष केले. पक्षाच्या 25 व्या स्थापना दिनाच्या समारंभात दिल्लीत पवारांनी ही घोषणा केली.

अजित पवार यांच्याबाबत कोणतीही घोषणा झाली नाही. पवारांनी केलेल्या घोषणेमध्ये सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्र, हरियाणा आणि पंजाबचीही जबाबदारी देण्यात आली आहे.

पवारांच्या या घोषणेने अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. फक्त सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांनाच कार्याध्यक्ष का करण्यात आले हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मात्र शरद पवार यांनी भाकरी फिरवली अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शरद पवार यांनी भाकरी फिरवण्यावर प्रश्न विचारण्यात आला. तर देवेंद्र फडणवीस यांनी एका शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. याला भाकरी फिरवणे म्हणत नाहीत ही तर धूळफेक आहे, असे फडणवीस म्हणाले. ते पुढे म्हणाले हा त्यांच्या अंतर्गत प्रश्न आहे ते बघून घेतली. 

कोणाकडे काय जबाबदारी?

प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाचे कार्याध्यक्षपद सोपवल्यानंतर आता महाराष्ट्रातील निवडणूकांची जबाबदारी ही सुप्रिया सुळे यांच्याकडे असेल. तसेच देशभरातील आगामी निवडणुकीची जबाबदारी हे नवे कार्याध्यक्ष सांभाळणार आहेत.

राष्ट्रीय पातळीवर वाटून देण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांमध्ये सुप्रिया सुळे या महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब या राज्यांची जबाबदारी सांभाळणार आहेत. तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, राजस्थान आणि गोवा या राज्यांची जबाबदारी सांभाळणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT