महाराष्ट्र बातम्या

मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपीसोबत ठाकरे गटाच्या नेत्याची पार्टी; राणेंचा आरोप, सरकारचा मोठा निर्णय

रोहित कणसे

विधीमंडळाच्या आजच्या कामकाजादरम्यान बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्याचा मुद्दा चांगलाच गाजला. भाजपचे नेते नितेश राणे, आशिष शेलार आणि शिवसेनेचे नेते दादा भुसे यांनी सभागृहात हा प्रश्न उपस्थित करत सुधाकर बडगुजर यांची याप्रकरणी चौकशी करुन कारवाई करावी अशी मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

यावर उत्तर देताना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याचे म्हटले आहे. फडणीस सभागृहात बोलताना म्हणाले की, हा विषय अतिशय गंभीर आहे. बॉम्ब स्फोटात जे आरोपी आहेत, तसेच देशाचा शत्रू असलेल्या दाऊदचा जवळचा सहकारी सलीम कुत्ता यासोबत पार्टी करणं, खरंतर हा पॅरोलवर बाहेर होता. त्यामुळे त्याला पार्टी देखील करता येत नाही. त्यामुळे त्याने पार्टी करायची आणि कोणीतरी जाऊन त्या पार्टीत नाचायचं हा गंभीर प्रकार आहे.

कुत्ता सोबत या संबंधीत व्यक्तीचा काय संबंध आहे, अशी पार्टी करण्यात कोण-कोण होते, त्याला कोणाचा वरदहस्त होता का? हे तपासण्यात येईल. बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत कोणी पार्टी करत असेल तर त्याचा अर्थ संवेदना मेल्यात असा होतो. म्हणून मी सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की एसआयटीच्या माध्यमातून ठरवून दिलेल्या वेळेत या प्रकरणाची तपासणी होईल. तसचे दोषींवर कारवाई केली जाईल असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT