Devendra Fadanvis Esakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadanvis: दिल्लीमध्ये संधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी चर्चांना दिला पूर्णविराम

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीत जाण्याच्या चर्चा अनेक वर्षांपासून रंगल्या आहेत. यावर अखेर फडणवीसांनीच प्रतिक्रिया दिली असून या चर्चांवर पडदा टाकला आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीत जाण्याच्या चर्चा अनेक वर्षांपासून रंगल्या आहेत. यावर अखेर फडणवीसांनीच प्रतिक्रिया दिली असून या चर्चांवर पडदा टाकला आहे. मी विधानसभा निवडणूक लढवणार आणि ते ही नागपूर मधूनच लढवणार असं म्हणत फडणवीसांनी चर्चांना पूर्णविराम दिला. (devendra fadnavis politician deputy chief minister of Maharashtra will contest Nagpur legislative assembly election)

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'मी विधानसभा लढवणार आणि तेही नागपूरमधूनच लढवणार आहे. पुढचे १० वर्षे तरी मी भारतीय जनता पक्षामध्ये असेल. तसेच पक्ष जी जबाबदारी देईल ती जबाबदारी स्वीकारण्यास मी तयार आहे.' देवेंद्र फडणवीस हे नैऋत्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. त्यामुळे पुढेही ते याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

राज्यात सध्या एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. तसेच येत्या काळात शिंदे यांच्याच नेतृत्वात महायुती ही निवडणूक लढवेल असं सांगण्यात येत आहे. फडणवीस यांच्या दिल्लीत जाण्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. फडणवीस इतर राज्यातील प्रचारासाठी जाताना दिसत आहेत. त्यामुळे फडणवीस यांना दिल्लीत पाठवण्याची तयारी सुरु असल्याचं बोललं जात होतं.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. असे असताना फडणवीसांना सत्ता स्थापन करता आली नाही. तसेच एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्ता स्थापन करताना फडणवीस हे मुख्यमंत्री होतील अशी अपेक्षा होती. पण, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार त्यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं होतं. तेव्हापासूनच त्यांना दिल्लीत संधी दिली जाईल अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mandangad Ghat Reopens : मुंबई, पुणे अन् महाडला जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी! अखेर 'हा' महत्त्वाचा घाटमार्ग 4 दिवसांनंतर वाहतुकीसाठी खुला; मंडणगड-दापोलीचा संपर्कही पूर्ववत

Nagpur: नागपूर-बडनेरा रेल्वेमार्गावर ‘एबीएस सिस्टिम’; ऑटोमॅटिक सिग्नलिंगने वाढणार वेग; १७५ किमीचा मार्ग जानेवारीपर्यंत पूर्ण होणार

Latest Marathi News Live Update : जेजुरीत भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू, सहा वारकरी जखमी

'मला त्या अदृश्य हातांची आठवण येतेय' किमोथेरिपी झाल्यानंतर मेधा मांजरेकरांची भावुक पोस्ट, म्हणाल्या...

Chhatrapati Sambhajinagar: म्हणे, मी त्याची पत्नी नाही; त्या खोलीत प्रवेशही नव्हता; बाबा फर्जन याच्या बंगल्यावरील कारवाई प्रकरणात अटकेतील महिलेचा एकाच दिवसात यू-टर्न

SCROLL FOR NEXT