महाराष्ट्र बातम्या

मुख्यमंत्री म्हणतात, ‘शिवसेनेच्या सगळ्या जागांवरील चाचपणीची माहिती नाही’

सकाळ डिजिटल टीम

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती होणार की नाही, अशी चर्चा सुरू असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच निवडणूक रिंगणात उतरेल, असे संकेत दिले आहेत. पुण्यात काल (शनिवार, १४ सप्टेंबर) महाजनादेश यात्रा झाली. त्यानंतर आज, सकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी, विधानसभा निवडणुकी महायुतीला भरघोस यश मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे युती फुटणार या चर्चेला पूर्णविराम मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शिवसेनेच्या चाचपणीविषयी माहिती नाही - मुख्यमंत्री
काही दिवसांपासून शिवसेना-भाजप स्वतंत्र लढणार असल्याची चर्चा सुरू होती. भाजपच्या गोटात १६० जागांवर विजय मिळवण्याविषयी विश्वास असल्यामुळे स्वतंत्र लढण्याविषयी आग्रह असल्याचे बोलले जात होते. परिणामी शिवसेनेने स्वतंत्र लढण्याची तयारीही केल्याची चर्चा होती. त्यांनी राज्यातील सर्व २८८ जागांवर उमेदवार उभे करण्याविषयी चचापणीही सुरू केली होती. या संदर्भात आज, पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारण्यात आले. त्यात त्यांनी ‘शिवसेनेने सर्व जागांसाठी केलेल्या चाचपणी विषयी माहिती नाही,’ असे सांगून हा प्रश्न टाळला. पण, त्याचवेळी विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करून, एकत्र लढण्याचे संकेत दिले.

पुण्याचा निर्णय एकत्र बसून घेऊ
गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप स्वतंत्र लढले होते. या निवडणुकीत एकत्र लढणार असल्याने जागा वाटपाचा तिढा काही ठिकाणी निर्माण झाला आहे. पुण्यात शिवसेनेला किती जागा सोडायच्या यावरून चर्चा सुरू आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, ते म्हणाले, ‘पुण्यात शिवसेनेला किती जागा सोडायच्या यावर दोन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतली.’ दरम्यान, महाजनादेश यात्रेच्यानिमित्ताने पुणे शहरात सिंहगड रोडवर झाडे तोडण्यात आली. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर करून यावर टीका केली होती. यावरही मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला असून, झाडे तोडली असल्यास संबंधितांवर गुन्हा दखल करू, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Tariffs Policy : इराण युद्धादरम्यान ट्रम्प यांची नवी चाल, औषधांवर लावला १०० % टॅरिफ, न्यायालयाने फटकारल्यानंतरही धोरण कायम

Gadchiroli News : भुकेल्या माओवाद्यांना पोलिस जवानांनी भरवला घास! कांकेरच्या जंगलात बंदुक हरली माणुसकी जिंकली

Abhishek Sharma ची खेळी गाजली, पण वादही पेटला! नेमकं काय घडलं की IPL ने ठोठावला मोठा दंड,KKR सामन्यानंतरचा मोठा ट्विस्ट

Latest Marathi News Live Update : ज्योतिबाचे दर्शन ठरले अखेरचे; पंचगंगा नदीपात्रात पोहताना दुर्गमानवाडचा तरुण बुडाला

IPL 2026: धोनी नसताना चेन्नईची कसोटी; पंजाबविरुद्ध आज सर्वच क्षेत्रांत प्रगती करण्याची गरज, कशी असेल संभावित Playing XI

SCROLL FOR NEXT