fadnavis thackeray e sakal
महाराष्ट्र बातम्या

उद्धव ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया

भाग्यश्री राऊत

मुंबई : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) आज मराठवाड्यामध्ये (Marathwada) आहेत. एका कार्यक्रमात आज उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb danwe) एकत्र आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाषणाची सुरुवात करताना 'आजी, माजी आणि एकत्र आलो तर भावी सहकारी' असं विधान केलं. त्यावरुन आता मोठ्या प्रमाणात राजकीय तर्क-वितर्क लढवण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना-भाजपा (shivsena-bjp) पुन्हा एकत्र येणार? ही चर्चा सुरु झाली आहे. त्यावरच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

राजकारणात कधीही काही होऊ शकतं. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. हे तिन्ही पक्षांचं अनैसर्गिक गठबंधन चालू आहे. ते फार काही टीकू शकणार नाही. महाराष्ट्राचं नुकसान होतंय. म्हणून त्यांनी मनातील भावना बोलून दाखविली. पण दोघांची युती होईल ते आज मला दिसत नाही. सरकार बनविण्यासाठी भाजपची मानसिकता नाही. भाजप सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत आहेत. लोकांच्या मनातील आशा घेऊन सरकारविरोधात आंदोलन करत आहोत. माननीय मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं की ते कशाप्रकारच्या लोकांसोबत काम करतोय. हे त्यांना समजलं, असे फडणवीस म्हणाले.

...तर आंदोलन करू

काँग्रेस, राष्ट्रवादीची भूमिका पूर्णपणे दुट्टपी आहे. एक भाव देशात आणण्यासाठी जीएसटीचा निर्णय सरकारने केला. आज काँग्रेस त्याला विरोध केला. त्यांचा खरा चेहरा उघड झाला आहे. पेट्रोल, डिझेल जीएसटीमध्ये आणण्यासाठी त्यांनी विरोध केला तर आम्ही काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी 'माजी मंत्री म्हणू नका', असं सूचक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी 'आजी, माजी आणि एकत्र आलो तर भावी सहकारी' असं विधान केलं. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT