Devendra Fadnavis on ED Action Nana Patole Lawyer  esakal
महाराष्ट्र बातम्या

सतीश उकेंवरील मूळ कारवाई नागपूर पोलिसांची : फडणवीस

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके (ED Action on Nana Patole Lawyer) यांच्यावर ईडीने कारवाई केली. त्यांना ईडीने ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) देखील वारंवार आरोप केले होते. आता उकेंवर झालेल्या ईडी कारवाईनंतर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र पोलिसांची ही कारवाई असल्याचं फडणवीस म्हणाले.

नागपूरच्या पोलिसांनी सतीश उकेंविरोधात एक गुन्हा दाखल केला होता. तसेच नागपूर पोलिसांनी तक्रार केली होती. ही मूळ कारवाई नागपूर पोलिसांची आहे. त्यानुसारच ईडीने कारवाई केली आहे. त्यांच्याविरोधात २००५ पासून गुन्हे दाखल आहेत. वेगवेगळ्या न्यायाधीशांची तक्रार केल्याबद्दल त्यांच्यावर न्यायालयाने कारवाई केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची शिक्षा का वाढविण्यात येऊ नये, असं म्हटलं होतं. आता हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुंबई मेट्रोवरून ठाकरे सरकारवर टीका -

राज्यात मेट्रोचं काम पूर्ण होत आहे आणि मेट्रो लोकांच्या सेवेत येत आहे. मुंबईतील कुलाबा मेट्रो लाईन ३ चं ८० टक्के काम पूर्ण झालं आहे. पण, कारशेड न मिळाल्यामुळे हे काम ४ वर्ष पूर्ण होणार नाही. आरेचं कारशेड सुरू केल्यानंतर ९ महिन्यात मेट्रो लाईन सुरू होईल. ही लाईन तत्काळ सुरू करण्याचा विचार सरकारनं करावं. अन्यथा श्रेय घेता घेता त्यांना हे अपश्रेय देखील घ्यावं लागेल, अशी टीका फडणवीसांनी ठाकरे सरकारवर केली.

राज्यात होणाऱ्या तपास यंत्रणांच्या कारवाया या अतिरेकी कारवाया असल्याचं संजय राऊत म्हणाले होते. त्यावर देखील फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली असून राऊत दररोज बोलतात. आम्ही त्यांना महत्व देत नाही, असं फडणवीस म्हणाले. तसेच अल्पसंख्याकाच्या मुद्द्यावरून देखील त्यांनी महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षामध्ये अल्पसंख्याकाची मत मिळविण्यासाठी एक चढाओढ लागली आहे, असं फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Crime: सातारा हादरला! 'चिकन 65 फुकट न दिल्याने दगडफेक'; 10 जणांवर गुन्हा, दोन हल्‍लेखोर ताब्‍यात

ऑनर किलिंगने हादरलं सूर्यापेट! आंतरजातीय प्रेमविवाहामुळे युवकाची क्रूरपणे हत्या; पत्नी म्हणाली, 'मी स्वप्नातही देखील..'

Latest Marathi News Updates : जयशंकर यांनी सिंगापूर दौऱ्यात विवान बालकृष्ण यांची भेट घेतली, दोन्ही नेत्यांमध्ये आर्थिक संबंधावर चर्चा

Satara Crime: 'वेळेनजीक सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्याला लुटले; वीस लाख लंपास, अपहरण करून पाय बांधले अन्..

Chandu Chauhan : ‘सर्जिकल स्ट्राइक’मधील वादग्रस्त चंदू चव्हाण अटकेत; पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT