Devendra fadnavis on Bullock Cart Race e sakal
महाराष्ट्र बातम्या

'आमच्या अहवालावर आधारीत बैलगाडा शर्यतीचा निकाल'

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने अटी-शर्ती घालून बैलगाडा शर्यतींना (Bullock Cart Race) परवानगी दिली आहे. त्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Opposition Leader Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली. आमच्या सरकारने दोन महिन्यात बैल हा धावणारा प्राणी आहे, असा अहवाल तयार केला होता. तो अहवाला न्यायालयाने स्वीकारला असून त्याआधारीत आजचा निकाल दिला आहे, असं फडणवीस म्हणाले.

२०१४ साली न्यायालयानं बैलगाडा शर्यतींवर बंदी टाकली होती. त्यानंतर आमचं सरकार आलं. त्यावेळी मी स्वतः केंद्राकडे पाठपुरावा केला. महेश लांडगे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ घेऊन केंद्र सरकारकडे गेलो. त्यानंतर तत्कालीन मंत्री जावडेकर यांनी गॅजेट काढलं आणि शर्यत पुन्हा सुरू झाली. पुन्हा न्यायालयाने बंदी घातल्यानंतर आम्ही २०१७ साली कायद केला. त्या कायद्याच्या माध्यमातून पुन्हा बैलगाडा शर्यत सुरू केली. मात्र, न्यायालयाने बंदी घातली. त्यानंतर बैल हा धावणारा प्राणी आहे, यासंदर्भातील अहवाल तयार करण्याचं निवेदन मिळालं होतं. त्यावेळी तत्कालीन मंत्री महादेव जानकर यांना निर्देश दिले होते. त्यावेळी आम्ही बैल हा धावणारा प्राणी आहे हे सिद्ध करणारा अहवाल दोन महिन्यात तयार करून सर्वोच्च न्यायालयात सादर केला. आमच्या सरकारच्या काळात तयार झालेल्या अहवालावर आधारीत न्यायालयाने हा निर्णय दिला आहे, असा फडणवीस म्हणाले.

अहवालामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सर्वांचे अभिनंदन -

बैलगाडा शर्यत हा आमचा पारंपारिक खेळ आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आवडीचा खेळ आहे. यावरची बंदी आज स्थगित केली त्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला आहे, असे देखील फडणवीस म्हणाले. तसेच त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानून अहवाल तयार करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सर्व घटकांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT