Devendra Fadanvis Esakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadanvis: अजित पवार गटातील मंत्री शरद पवारांच्या भेटीला; फडणवीस म्हणाले, 'जर ही भेट झाली असेल तर...'

अजित पवार गटातील मंत्री शरद पवारांच्या भेटीवर फडणवीसांनी प्रतिक्रीया दिली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या अन्य मंत्र्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

'मला याची काही कल्पना नाही. पण जर त्यांनी पवारसाहेबांची भेट घेतली असेल. त्यात वेगळं काही नाही. कारण वर्षानुवर्षे शरद पवार हे त्यांचे नेते राहिले आहेत. त्यामुळे जर ही भेट झाली असेल तर त्यात काही वावगं आहे, असं मला वाटत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. (Marathi Tajya Batmya)

उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, अनिल पाटील, धर्मराव बाबा आत्राम, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व मंत्री काही वेळाआधी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये गेले होते. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्येच असल्याने त्यांची भेट घेण्यासाठी हे नेते पोहोचले होते.

भेटीनंतर प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं नेमकं कारण

आमचे सर्वांचे दैवत, आमचे नेते, आदरणीय शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. वेळ न मागता आम्ही आलो. शरद पवार हे चव्हाण सेंटरला मिटिंग निमित्त आल्याचं कळालं होतं. त्यामुळे संधी साधून आम्ही इथे आलो. पवार साहेबांच्या पाया पडून आशीर्वाद मागितले. सोबत आम्ही सर्वांनी साहेबांना विनंती केली की, आमच्या मनात त्यांच्यासाठी आदर आहेच. राष्ट्रवादी एकसंघ कसा राहू शकतो यासाठी त्यांनी योग्य विचार करावा आणि मार्गदर्शन करण्याची विनंती केली आहे, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले. (Marathi Tajya Batmya)

यावर शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आमचं मत शांतपणे ऐकून घेतलं आहे. आता उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे. सर्व मंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात आपआपल्या विभागागाची जबाबदारीही पार पाडणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

Udgir Gutkha Seized : पाठलाग करून साडेदहा लाखांचा गुटखा पकडला; एक चारचाकी तर एक आरोपी ताब्यात

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Yermala News : कलाकेंद्र चालकाचा नियमांचा भंग; महाकाली कला केंद्राबाबत जिल्हाधिकारी यांचा मोठा निर्णय

Mumbai: चालत्या ट्रेनमधून केसांना धरत तरुणीला बाहेर ओढलं नंतर...; महिलेचं धक्कादायक कृत्य, मुंबई लोकलमधील राड्याचा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT