Devendra Fadnavis said, At least show the government running Devendra Fadnavis said, At least show the government running
महाराष्ट्र बातम्या

सरकार किमान चालवून तरी दाखवा, देवेंद्र फडणवीसांचा टोला

आम्ही जिंकून आल्याने काही बावचळले आहेत, तर काही पिसाटले असल्याचं फडणवीस म्हणाले.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : नागरिकांनी भाजप आणि शिवसेनेच्या सरकारला मतदान केले होते. मात्र, शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला सोबत घेऊन सरकार स्थापन केले. बेईमानीने सरकार स्थापन केले आता सरकार किमान चालवून तरी दाखवा, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. (Devendra Fadnavis said, At least show the government running)

राज्यसभेत मिळालेल्या विजयानंतर मुंबईत कार्यकर्त्यांना संबोधित करतान ते बोलत होते. राज्यसभेत आपले तिन्ही उमेदवार निवडून आले ही चांगली गोष्ट आहे. मात्र, हा छोटा विजय आहे. मोठी लढाई अजून बाकी आहे. आपल्या येणाऱ्या निवडणुका जिंकायच्या आहेत. केवळ आम्हाला विरोध करायचा म्हणून महाराष्ट्रातले आमचे प्रकल्प बंद पाडले आहेत. यामुळे नुकसान होत आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाविका आघाडी सरकारमुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. महाविकास आघाडीमुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्र थांबल आहे. विकास थांबला आहे. राज्यसभेच्या निकालानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या तोंडट पाणी पळाले आहे. पराभवाने ‘मविआ’चे नेते पिसाटलेले आहेत, असेही देवेंद्र फटणवीस म्हणाले.

शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. मात्र, हे सरकार काहीही करत नाही. राज्यकर्त्यांनी राज्यकर्त्यांसारख वागल पाहीजे. सुद्देवाने मुंबईत माझे घर नाही. असते तर मलाही नोटीस आली असती. नागपुरातील माझे घर नियमानुसार बांधले आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: 'मी तुम्हाला बोलावलंच नाहीये...' जेव्हा जसप्रीत बुमराहची सटकते; विमानतळाबाहेर रिपोर्टर्सवर भडकला

Pune : लालपरीची काय ही अवस्था? दरवाजाच नाही, तरी प्रवाशांच्या सेवेत; जीव धोक्यात घालून प्रवास

Latest Marathi News Live Update : नागपूर रेल्वे स्थानक परिसरात शिवसेनेचा मोर्चा

Solapur: ७६ वर्षांनंतर सीनानदी धोक्याच्या पातळीवर; १९४९ नंतरचा सर्वात मोठा पूर, पातळी ४३०.६ मीटरवर

'तिला थंडी ताप आला त्याचं वेळी जर...' आईच्या आठवणीत तेजस्विनीला भावूक होऊन म्हणाली...'आयुष्याचा काही नेम नाही..'

SCROLL FOR NEXT