Cm Eknath Shinde Devendra Fadnavis Sakal
महाराष्ट्र बातम्या

CM Shinde in Nagpur : फडणवीसांच्या जोडीने मुख्यमंत्री संघ मुख्यालयात; संजय राऊतांनी दिला सल्ला

त्यांनी संघाचे संस्थापक हेडगेवार यांच्या प्रतिमेला वंदनही केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरातल्या संघ मुख्यालयाला भेट दिली. त्यावरुन आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांना सल्ला दिला आहे.

नागपुरात सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाचा उद्या समारोप होणार आहे. त्यापूर्वी आज सकाळी शिंदे आणि फडणवीसांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातल्या स्मृती मंदिर परिसराला भेट दिली.

यावेळी त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर तिथून पुढे हे दोघे दीक्षाभूमी इथं गेले. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावरुनच एकनाथ शिंदेंना टोमणा मारला आहे.

हेही वाचा - क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, "रेशीमबागेत जाऊन आलात आनंद आहे! या वास्तू सोबत लाखो स्वयंसेवक वर्षानुवर्षे एकनिष्ठ आहेत. त्यांनी कधीही संघ किंवा मुख्यालय हडप करण्याचा नीच प्रयत्न केला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून संघटनेप्रती निष्ठा काय असते हे ही शिकून घेतले असते तर अजून बरे वाटले असते."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

AI आणि रोबोट्समुळे नोकऱ्या धोक्यात! बिल गेट्स यांना चिंता; ‘ह्यूमन रिजर्व्ड’चा फॉर्म्युला सुचवला, आरक्षणाची मागणी

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

Numerology: गर्दीतही वेगळी ओळख! इतर लोकांपेक्षा वेगळा विचार का करतात 'या' मूलांकाचे लोक? ट्रेंड फॉलो करत नाहीत...

SCROLL FOR NEXT