Devendra Fadnavis and Eknath Shinde Esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde: फडणवीस म्हणाले 'मी पुन्हा येईन' ही CM शिंदेंसाठी चिंतेची बाब; राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला

मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहित आहे, फडणवीसांचं वक्तव्य

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सत्ताबदलाचे वारे वाहू लागले आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधलं. मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच, मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहित आहे. असं वक्तव्य फडणवीसांनी केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

त्यांच्या याच वक्तव्यानंतर काही राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांचे मी पुन्हा येईन म्हणणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी चिंतेची बाब असल्याचं म्हणत राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना खोचक टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या पुन्हा येईन या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले की, "त्यांच्या या वक्तव्याची आम्हाला भीती नाही. त्यांच्या वक्तव्याची भीती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाटायला पाहिजे. पुन्हा येईन म्हणतायत आणि आलेलेच आहेत. फक्त दोन नंबरला बसलेले आहेत. त्यामुळे ते मी पुन्हा येईन म्हणत असतील आणि शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरुन बाजूला ढकलून स्वतः बसत असतील तर त्याची चिंता शिंदे यांनी केली पाहिजे." तसेच एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे 40 वीर गेले आहेत, त्यांनी देखील याची चिंता केली पाहिजे, असंही जयंत पाटील यावेळी म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच. मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहित आहे. आपलं कुलदैवत नरसिंह आपण कुठूनही प्रगती करतो." उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंदगडमधील निट्टूर गावात बोलताना हे वक्तव्य केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT