Ajit Pawar, Sharad Pawar and Devendra Fadnavis  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : ''मी क्लिन बोल्ड होण्याऐवजी पवारांनी त्यांच्या पुतण्याला बोल्ड केलं, आणखी सत्य बाहेर आणणार''

संतोष कानडे

मुंबईः पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांचा डाव होता असं म्हणणाऱ्या फडणवीसांना शरद पवारांनी उत्तर दिलं होतं. मी गुगली टाकली त्यात फडणवीसांची विकेट गेली, असं काही वेळापूर्वी शरद पवार म्हणाले होते. त्याला आता देवेंद्र फडणवीसांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?

2019 आम्ही भेटलो ही गोष्ट खरी आहे. परंतु मी दोन दिवसांनी धोरण बदलल्यानंतर त्यांनी शपथ का घेतली? चोरुन शपथ घ्यायची काय गरज होती? मी फसवलं असेल तर ते का फसले? उद्या मी तुम्हांला सांगतो गव्हर्नर करतो, या शपथ घ्यायला, याल का तुम्ही? मी जगाच्या क्रिकेटचा अध्यक्ष होतो. गुगली कसा टाकायचा आणि कुठं टाकायचा, हे माहिती होतं. मी खेळलो नसलो तरी माहिती होतं. फडणवीसांनीच विकेट दिली तर करायचं काय? विकेट घेतली पाहिजे, असा थेट हल्ला शरद पवार यांनी केला होता.

आता फक्त अर्धसत्यच बाहेर आलेलं आहे- फडणवीस

शरद पवारांच्या तोंडी मी सत्य आणलं, याचा मला आनंद आहे. परंतु हे अर्धच सत्य आहे. त्यांनी पूर्ण सत्य सांगितलं नाही. मी गुगली फेकणार आणि पूर्ण सत्य बाहेर आणणार. यातून मी बोल्ड होण्याऐवजी त्यांनी त्यांच्या पुतण्याला बोल्ड केलं आहे. अजित पवारांना पुढे करुन त्यांनी त्यांची अडचण केल्याचाही पलटवार फडणवीस यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT