PM Modi
PM Modi Esakal
महाराष्ट्र

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यासाठी त्यांनी...'; फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

अंकिता खाणे (Ankita Khane)

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याच्या राजकारणात अनेक आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं असा गौप्यस्फोट करत मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं, असं म्हटलं आहे.

त्याचबरोबर उद्धव ठाकरे निवडणुकीच्या प्रचारावेळी वैयक्तिक टीका करणारी जी भाषा वापरतात. ती कीव करण्यासारखी आहे, असा हल्लाबोल देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी सकाळ वृत्तपत्राला मुलाखत दिली यावेळी त्यांनी अनेक मोठमोठे गौप्यस्फोट केले. उद्धव ठाकरे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र असल्यामुळे काही गोष्टी लक्षात आल्या तरी आम्ही त्यांना काही बोलायचो नाही, असं देखील फडणवीस म्हणाले आहेत.

उध्दव ठाकरे हे आमच्यासाठी वंदनीय असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र होते. काही गोष्टी लक्षात आल्या तरी आम्ही बोलायचो नाही. ठाकरेंबद्दलच्या आदरापोटी श्रद्धेपोटी तसे वागायचो. खरे तर उध्दवजींना तर युतीची सत्ता आल्यानंतर १९९९ पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पडू लागली होती. १९९९ च्या निवडणूक निकालांनंतर त्यांचे नाव पुढे येईना मुख्यमंत्रिपदासाठी म्हणून त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. नारायण राणे यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्यापासून रोखण्याची सोय बघितली. तसे पाहिले तर राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगण्यात काही गैर नाही पण त्यामागचा हेतू काय हे सार्वजनिक जीवनात महत्त्वाचे असते. उद्धवजींना जनहितापेक्षाही पद महत्त्वाचे वाटत असावे असे वाटते, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.

पुढे फडणवीस म्हणाले, भाजपला सोडून उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जातील, असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. पण २०१९ मध्ये त्यांनी वेगळी आघाडी केली. मी मनापासून सांगतो की, आम्ही वैचारिक निष्ठांना सर्वाधिक महत्त्व देतो. बाळासाहेबांचे चिरंजीव कसे वागू शकतात यावर आमचा विश्वास होता. पण आमची चूक झाली.

"राज्यात युतीचं सरकार असून देखील मी मुख्यमंत्री झालो नाही, याचा मला धक्का बसला होता. नंतर लगेच मी विरोधी पक्षनेता या नात्याने काम करू लागलो. संकटे, आव्हाने येत असतात. पुढे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याबाबतचा निर्णय घेण्यात माझा महत्त्वाचा सहभाग होता. पक्षकार्यकर्ता म्हणून मी ते केले", असंही फडणवीसांनी पुढे म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Hamas War: ''मोदींच 'हे' करु शकतात, कारण ते ग्लोबल लिडर आहेत'', पॅलेस्टाईनच्या पंतप्रधानांचं पत्र

T20 WC 24 Super 8 : सुपर-8ची शर्यत रोमांच मोडवर! 20 पैकी 11 संघांचा पत्ता कट; आता एका जागेसाठी दोन टीममध्ये टक्कर

Ganga Dussehra 2024: गंगा दशहराला काय करावे अन् काय नाही वाचा एका क्लिकवर

Ravindra Waikar : ज्या मोबाईलवरुन EVM अनलॉक केलं, तोच मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याला दिला; धक्कादायक प्रकार उघड

Latest Marathi News Live Update : तुर्भे एमआयडीसी परिसरात पाण्यात बुडून 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT