Devendra Fadnavis Anil Deshmukh  
महाराष्ट्र बातम्या

Anil Deshmukh-Fadnavis: फडणवीसांचा निरोप घेऊन येणारा तो व्यक्ती कोण? अनिल देशमुखांनी नाव सांगितल्याने खळबळ

Anil Deshmukh- Devendra Fadnavis case mentioned name Samit Kadam: गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. अनिल देशमुख यानी फडणवीसांवर गंभीर आरोप केलेत.

कार्तिक पुजारी

मुंबई- माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी झडत आहेत. ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मला ऑफर दिली होती, असा गंभीर आरोप अनिल देशमुखांनी केला होता. फडणवीस यांची ऑफर घेऊन येणारा व्यक्ती कोण? याबाबत देखील देशमुखांनी खुलासा केला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अनिल देखमुख यांनी दावा केलाय की, ''प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी समित कदम याला त्यांच्याकडे पाठवलं होतं. समित कदम हा सांगलीच्या मिरजमधील नेता आहे. तो जनसुराज्य शक्ती पार्टीचा अध्यक्ष आहे. तोच माझ्या निवासस्थानी आणि घरी आला होता. फडणवीस यांना तुमच्याशी बोलायचं आहे, असं तो म्हणाला होता.''

देखमुखांनी सांगितलं की, ''सचित कदमने त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला. तो मला पाच ते सहावेळा भेटला. मी फडणवीसांचे मेसेज घेऊन आलोय असं तो म्हणाला होता. त्याने एका लिफाफ्यामध्ये प्रतिज्ञापत्र आणले होते. त्याच्यासोबत भेटीचे माझ्याकडे व्हिडिओ फुटेज आहेत.मी योग्य वेळेला यासंदर्भातील रिकॉर्डिंग जाहीर करेन.''

देवेंद्र फडणवीस यांनी काय दिली प्रतिक्रिया दिली?

टाइम्स ऑफ इंडियाकडून देवेंद्र फडणवीसांना यासंदर्भात विचारण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी एसएमएसच्या माध्यामातून प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणालेत की, ''अनिल देखमुख हे खोटं नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना आधी पुरावे देऊ द्या. त्यानंतर मी माझ्याकडे असणारे त्यांचे सर्व क्लिप सार्वजनिक करतो.''

गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. अनिल देशमुख यानी फडणवीसांवर गंभीर आरोप केलेत. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांना यांना अडकवण्यासाठी देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत होते. यासाठी त्यांनी मला चार प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी दबाव टाकला होता, असं ते म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: ट्रम्प यांचे एक वक्तव्य आणि शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1400 अंकांनी खाली; Indigo चे शेअर्स चर्चेत

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

SCROLL FOR NEXT