Devendra Fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

व्हिजन डॉक्‍युमेंट 2030 वर काम सुरू

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - राज्याचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सन 2030 पर्यंतचा आरखडा तयार केला असून, त्या अनुषंगाने कालबद्ध पद्धतीने योजना राबविण्यात येणार आहेत. या संदर्भात काही विभागांनी तयार केलेल्या व्हिजन डॉक्‍युमेंटचे फडणवीस यांच्याकडे आज सादरीकरण करण्यात आल्याचे समजते.

केंद्राच्या निती आयोगाने सूचित केल्याप्रमाणे राज्यातील प्रत्येक विभागांनी पुढील पंधरा वर्षांसाठी व्हिजन डॉक्‍युमेंट तयार केले आहे. हा आरखडा सुरवातीला तीन वर्षांसाठी असेल आणि त्या दृष्टीने विकास योजना राबविण्यात येणार आहेत. सध्या फडणवीस यांच्याकडून व्हिजन डॉक्‍युमेंटचा अभ्यास सुरू असून, तयार झालेल्या आराखड्यात काही प्रमाणात मुख्यमंत्री बदल सुचवतील. संबंधित आरखडाचा आढावा संपल्यानंतर सर्व विभागांच्या आराखड्याला मंत्रिमंडळाची मान्यता मिळेल. त्यानंतरचे राज्याचा आराखडा निती आयोगाकडे पाठविण्यात येणार असून, त्या आधारे केंद्राचा निधी राज्याला प्राप्त होणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. राज्यात सध्या जलयुक्‍त शिवार ही योजना अत्यंत यशस्वी झाल्याने दुष्काळमुक्‍तीच्या दिशेने जाण्यास फडणवीस यांनी प्राधान्य दिले आहे. भविष्यात "जलयुक्‍त'ची अधिकची कामे होती घेण्यात येणार असून योजनेमुळे साठलेल्या पाण्याच्या साठ्यांचे नियोजन करण्यात येणार आहे.

राज्यात जवळपास पन्नास टक्‍के इतके नागरीकरण आहे. शहरात राहणाऱ्या जनतेला घरांची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्यामुळे शहरी भागात परवडणाऱ्या घरांची योजना राबविण्यावर सरकारचा भर असेल. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादसारख्या शहरात मोठ्या प्रमाणात घरांचे प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे गृहनिर्माण विभागातून सांगण्यात आले. त्याचबरोबर मुंबईसह मोठ्या शहरांत वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. यासाठी मुंबईच्या धर्तीवर अन्य शहरांत पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. मुंबईसाठी सागरी वाहतुकीचा आणखी एक पर्याय शिल्लक असून हा प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्यावर सरकारचा भर असेल, असे परिवहन खात्यातून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 मध्ये मोठा धक्का! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर मोठं कांड उघड; RCB vs GT सामन्यात गोंधळ, दोघांना अटक, काय घडलं?

Minister Madhuri Misal : प्रकल्प वेळेत पूर्ण करा अन्यथा कारवाई; राज्यमंत्री मिसाळ यांचा इशारा

DC vs RCB Live: दिल्ली कॅपिटल्सचे वस्त्रहरण! पण, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 'नकोसा' डाग मिटवता नाही आला; भुवी, जोश यांचा कहर...

वंदे भारत एक्सप्रेसचा डबा घसरला, पुणे रेल्वे स्टेशनवरील घटना, नेमकं काय घडलं?

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या अडचणीत वाढ! फॉर्मात असलेल्या खेळाडूची स्पर्धेतून माघार, फ्रँचायझीने त्याच्या जागी कुणाला घेतले पाहा...

SCROLL FOR NEXT