Dilip Walse Patil on Devendra Fadnavis Inquiry
Dilip Walse Patil on Devendra Fadnavis Inquiry esakal
महाराष्ट्र

स्टिंग ऑपरेशनचा तपास CIDकडं, सरकारी वकिलांनी दिला राजीनामा - गृहमंत्री

सुधीर काकडे

राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी गिरीष महाजन (Girish Mahajan) यांना अडवण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप करत एक पेन ड्राईव्ह (Pen Drive Bomb) विधीमंडळात सादर केला होता. त्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या आरोपांना उत्तर दिलं. या स्टिंग ऑपरेशनवरबद्दल बोलताना गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, तुमचा आरोप काहीही असला तरी मी कुणाची पाठाराखण करणार नाही. मी तपासेल की, या मागे कोण आहे, दोषी कोण आहे. त्यांच्यावर काय कारवाई करायची? हे आपण पाहणार आहोत. तसंच पुढे बोलताना ते म्हणाले की, फडणवीसांनी मागेही एक पेन ड्राईव्ह दिला होता, दोन दिवसांपूर्वी पेन ड्राईव्ह दिला, आज पून्हा एक पेन ड्राईव्ह दिला. आपण एक डिटेक्टीव्ह एजन्सी तयार केली की काय? असा सवाल वळसे पाटलांनी केला. तसंच प्रवीण चव्हाण यांनी आपल्या वकील पत्राचा राजीनामा दिला असून, सरकारने तो मान्य केला आहे. तसंच या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे सोपवत असल्याचं गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितलं.

गिरीष महाजन यांच्याशी संबंधीत प्रकरणावरून आपण जे आरोप केलेत. त्याबद्दल बोलताना वळसे पाटील म्हणाले, आपला आरोप आहे की, महाजानांच्या विरोधात आम्ही षडयंत्र करतोय. मात्र आपण सांगू इच्छितो की, जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्था या संस्थेची १९१७ ला स्थापणा झाली. यासंबंधीत भोईटे आणि पाटील गटातील वाद कोर्टात आहे. ही घटना झाल्यानंतर, यामध्ये २९ आरोपी अटक केले. या प्रकरणात मला एवढंच विचारायचं की, पोलीस संरक्षण घेऊन यांना ही संस्था का चालवावी लागतेय. या संस्थेवर कब्जा करण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे. जवळपास ३०० दिवसांपेक्षा जास्त काळ संस्थेला बंदोबस्त दिला. याबद्दलचं खरं वास्तव्य समोर आलं पाहिजे, म्हणून आपण त्यामध्ये कारवाईला सुरुवात केली.

गिरीष महाजन प्रकरणातील घटना पुण्यात घडली, गुन्हा निंभोऱ्यात दाखल झाला, यावरुन विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला. मात्र मी सांगू इच्छितो की, सुशांतसिंह प्रकरणात घटना मुंबईत झाली, त्याचा गुन्हा बिहारमध्ये दाखल झाला. या घटनेचं आपण समर्थन करत नाहीत. फिर्यादीनुसार संस्थेच्या प्रकरणात आरोपी निलेश भोईटे यांनी संस्थेची कागदपत्र देतो सांगून, मारहाण आणि दमदाटी करून ही संस्था आमच्या ताब्यात द्या असं सांगितलं. गिरीष भाऊ तुम्हाला १ कोटी रुपये देतील असाही आरोप फिर्यादींनी केल्याचं वळसे पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, या प्रकरणात आम्ही सखोल चौकशी करणार असून, या प्रकरणाचा तपास सीआयडी करेल असा निर्णय आपण जाहीर करतो असं गृहमंत्री म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Janhvi Kapoor: मराठी कलाकारांच्या मुस्काडात... गांधी-आंबेडकरांवरील जान्हवीच्या 'त्या' विधानानंतर किरण मानेंची पोस्ट व्हायरल

Loksabha Election 2024 : राजधानीत मोदी विरुद्ध केजरीवाल लढत; दिल्लीत आज मतदान

Bankura Loksabha Election : कम्युनिस्टांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा प्रभाव

Sharad Pawar : दुष्काळाबाबत सरकार गंभीर नाही

SSC HSC : दहावी-बारावीची ग्रेड पद्धत होणार बंद

SCROLL FOR NEXT