Devendra Fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी खळबळ आज सकाळी पाहायला मिळाली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

राजभवनात आज (शनिवार) राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. राष्ट्रवादी आणि भाजप हे दोन पक्ष एकत्र आल्याचे यावरून तरी दिसत आहे. यावेळी पार्थ पवार, सुनेत्रा पवार राजभवनात उपस्थित होत्या.

महाराष्ट्रातील राजसत्तेचे शिवधनुष्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पेलणार असल्याचे स्पष्ट संकेत देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब केले होते. मात्र, महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाल्याचे पाहायला मिळाले. 

फडणवीस म्हणाले, की जनादेश आम्हाला महायुती म्हणून मिळाले होते. आम्ही एकमेकांना काय वचन दिले हे पाहण्यापेक्षा जनतेला दिलेले वचन महत्त्वाचे आहे. आमच्यासोबत येण्यापेक्षा दुसऱ्यासोबत जाणार असल्याने आम्हाला हा निर्णय घेतला. मी मोदी, अमित शहा यांचे आभार मानतो. 

स्थिर सरकारसाठी घेतला निर्णय : अजित पवार
महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. शिवसेनेसोबत चर्चा संपतच नव्हती. त्यामध्ये नको त्या गोष्टीची मागणी वाढत चालली होती. राज्याला स्थिर सरकार मिळण्यासाठी यासाठी हा निर्णय मी घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd Test Live: आज खरंच गरज नव्हती! रिषभ पंतच्या घाईने भारताला आणखी अडचणीत आणले; विक्रम नोंदवला, पण...

सार्वजनिक शौचालयाचं दार लावलं, मारहाण करत...; ६० वर्षीय महिलेसोबत २७ वर्षीय तरुणाचं नको ते कृत्य, घाटकोपर रेल्वे स्थानकातील घटना

कोविड लसीचे दुष्परिणाम होते....; झुकरबर्गच्या आरोपांवर मस्क यांची प्रतिक्रिया

Marathi News Live Updates : शरद पवारांचा इतिहास खंजीर खुपसण्याचा; डिलिमिटेशनवरून कांग्रेस आक्रमक, वडेट्टीवर खूप काही बोलले

Gokul Annual General Meeting : गोकुळची वार्षिक सभेची तारीख ठरली; संचालक मंडळाला सहकार विभागाची मुदतवाढ

SCROLL FOR NEXT