मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषींना कोण संरक्षण देते हे आपण पाहिले आहे. मंत्री बनवलेले त्यांचे (दहशतवादी) साथीदार आजही तुरुंगात बसले आहेत. आमच्या सरकारमध्ये हिंमत होती. आम्ही रात्री सुप्रीम कोर्ट उघडून बॉम्बस्फोटातील दोषींना दोषी ठरवले. अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना या मुद्द्यावरून महाविकास आघाडीवर टीकास्र सोडलं आहे.(Devendra Fadnavis Targets Uddhav Thackeray On Yakub Memon Grave Issue)
दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभिकरणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण तापलं आहे. या याकूब मेननच्या कबरीचं सुशोभिकरण करून एका दहशतवाद्याच्या प्रतिमे संवर्धन केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
मात्र, याकूब मेननच्या कबरीचं कोणत्याही प्रकारटं सुशोभिकरणाचं झालं नसल्याचं या कब्रिस्तानच्या ट्रस्टीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. यासंदर्भात वेगवेगळे दावे-प्रतिदावे सुरू असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना या मुद्द्यावरून महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
“मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्यांना कोण कोण संरक्षण देतं हे आम्ही पाहिलं आहे. त्यांचे साथीदार अजूनही जेलमध्ये बसले आहेत, ज्यांना मंत्री बनवलं गेलं”, असं फडणवीस म्हणाले.
तसेच, “सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की आम्ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलो. आमच्या सरकारमध्ये हिंमत होती. रात्री २ वाजता सर्वोच्च न्यायालय उघडलं. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेतली आणि त्यानंतर मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीला फाशी दिली गेली. हे प्रतिमा संवर्धन कुणाच्या काळात झालं, हे तुम्हाला माहिती आहे”, अशा सूचक शब्दांत फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकार अप्रत्यक्षपणे टीकास्त्र सोडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.