Uddhav Thackrey Esakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadanvis: 'हे फेस टू फेस बोलणारे सरकार...हे 'फेसबुक'वर बोलणारं सरकार नाही', फडणवीसांचा ठाकरेंना टोला

देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिर्डीतील काकडी गावात आले आहेत. यावेळी जनतेशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरकारच्या 'शासन आपल्या दारी' या उपक्रमाच्या माध्यमातून चांगले काम होत असल्याचं सांगितले. त्याचबरोबर यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की, शासन आपल्या दारी हा कार्यक्रम कार्यक्रमापुरता मर्यादित नाही. वर्षांचे ३६५ दिवस हे सरकार जनतेच्या दारी जात राहणार आहे. हे लोकांपर्यंत जाणार सरकार आहे. कारण हे बंद दाराआड काम करणारे सरकार नाही तर हे फेस टू फेस बोलणारे सरकार आहे. हे फेसबुकवर बोलणारं सरकार नाही असा अप्रत्यक्ष टोला फडणवीसांनी ठाकरेंना लगावला आहे.

पुढे ते म्हणाले की, आम्ही जनतेपर्यंत पोहोचलो आहोत. पुढे ही पोहचत राहणार आहोत. निश्चितपणे जनतेच्या जीवनात परिवर्तन करणारे हे सरकार आहे. नवीन सरकारने आणलेल्या योजना अनेंकापर्यंत पोहचत आहेत, असंही पुढे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

त्याचबरोबर १ रुपयात सुरू केलेली पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरणार आहे. राज्यात सध्या पावसाने ब्रेक घेतला आहे, मी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो अशी परिस्थीती येऊ नये पण, दुर्दैवाने दुष्काळाची परिस्थिती आलीच तर या पीक विम्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल असंही फडणवीस पुढे म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT