Devendra Fadnavis: esakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांची कारकीर्द संपवण्याची धमकी!जयसिंघानीविरोधातील आरोपपत्रात खुलासे

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे खंडणीची मागणी केल्याप्रकरणी सट्टेबाज अनिल जयसिंघानी व त्याची मुलगी अनिक्षा यांच्याविरोधात दाखल आरोपपत्रात गंभीर माहिती समोर आली आहे.

या दोघांनीही अमृता फडणवीस यांच्याशी केलेल्या संभाषणाची ध्वनिफीत खंडणीसाठी रेकॉर्ड केली होती. ही ध्वनिफीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवण्याची धमकी दिली.

अनिक्षा हा मोठा राजकीय मुद्दा बनवून फडणवीसांना लक्ष्य करत होती. ते उपमुख्यमंत्रिपद गमावू शकतात आणि त्यांची राजकीय कारकीर्द संपू शकते, अशी धमकी दिल्याचा आरोप आरोपपत्रात करण्यात आला आहे.

मलबार हिल पोलिसांनी याप्रकरणी मे महिन्यात न्यायालयामध्ये ७३३ पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रांत १३ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. त्यात या प्रकरणाबाबत अनेक गंभीर खुलासे झाले आहेत.

आरोपपत्रात अनिक्षाने अमृता फडणवीस यांना पाठवलेल्या धमकीच्या संदेशांचाही समावेश आहे. अमृता फडणवीस यांनी अनिक्षाच्या धमक्यांमुळे तिचे फोन घेणे बंद केले होते. तिचा मोबाईल क्रमांकही ब्लॉक केला होता.

त्याबाबत २१ फेब्रुवारीला अनिक्षाने अमृता फडणवीस यांना पाठवलेल्या संदेशात, मोबाईल क्रमांक ब्लॉक केल्यामुळे तिचे वडील अनिल जयसिंघानी रागावले आहेत. ते तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना हानी पोहोचवतील, अशी थेट धमकीच दिली आहे.

अनिल जयसिंघानीविरुद्ध १७ गुन्ह्यांची नोंद असल्यामुळे तो ८ वर्षे फरार होता. यामुळे गेल्या काही वर्षांत १००० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा अनिल जयसिंघानीने अमृता फडणवीस यांच्याशी संभाषणात केला आहे.

ब्लॅकमेलिंगचा आरोप

अनिक्षा जयसिंघानीने फॅशन डिझायनर असल्याचे सांगून जवळीक साधत गुन्हेगारी प्रकरणातून वडिलांना बाहेर काढण्यासाठी मदतीची मागणी अमृता फडणवीस यांच्याकडे केली होती.

याबदल्यात सट्टेबाजांकडून सट्ट्यातून मिळणारे पैसे, मदत करण्यासाठी एक कोटी रुपये देऊ केले. बनावट ध्वनिचित्रफीत पाठवून त्याआधारे ब्लॅकमेलिंग करीत १० कोटींची खंडणी मागितली होती. चॅट्समध्ये जयसिंघानीने अमृता फडवणवीस यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोपही केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Grand Tour 2026 : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांचे जाळे; ९०० कोटींचा खर्च अपेक्षित

Pali News : रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल! 'या' तारखेपर्यंत दुपारऐवजी भरणार सकाळी शाळा

Vidhan parishad Exit Poll 2026: विधान परिषद निवडणूक! महायुतीची एकतर्फी सरशी? 12 पैकी किती जागा जिंकणार?

Crime: क्रूरतेचा कळस! घराबाहेर पडताच टोळक्यानं गाठलं; आधी महिलेवर सामुहिक अत्याचार, नंतर गुप्तांगामध्ये काठी, काडतूस टाकलं अन्...

Pune Fraud News : पर्यटन व्यावसायिकाकडून महिलेची दोन लाखांची फसवणूक; टूरला येणाऱ्या सदस्याचा मृत्यू झाल्याचे सांगत सहल केली रद्द

SCROLL FOR NEXT