महाराष्ट्र बातम्या

अखेर फडणवीसांनी सांगितलं उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचं पडद्यामागचं कारण...

सकाळ डिजिटल टीम

नागपूर - एकापाठोपाठ एक धक्कादायक घडामोडीनंतर महाराष्ट्रात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटासह भाजपने महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. सोमवारी नव्या सरकारने विधानसभेत बहुमतही सिद्ध केलं. या सर्व घडामोडीत देवेंद्र फडणवीस यांची भूमिका सर्वात महत्त्वाची होती. त्यामुळे मुख्यमंत्री तेच होणार, अशी चर्चा असताना ऐनवेळी फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं. फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद कस स्वीकारलं यामागची खरी स्टोरी फडणवीसांनी आज सांगितली. (Devendra Fadnavis told story of becoming Depty CM)

नागपूर येथे माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी सुरुवातीला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कसे झाले याची माहिती दिली. आम्ही मुख्यमंत्रीपदासाठी आग्रह केला नाही. आग्रह केला असता तर मुख्यमंत्री पद मिळालं असतं. आमच्याकडे जास्त आमदार असतानाही शिवसेनेचाच मुख्यमंत्री करायचा होता. मी म्हटल म्हणून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले, असं फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की आपण सरकारच्या बाहेर राहुन पक्ष संघटनेत काम करणार होतो. मात्र मला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा फोन आला. त्यांनी मला उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास सांगितलं. त्यानंतर अमित शहा यांचाही फोन आल्याचं फडणवीसांनी म्हटलं.

दोन शक्तीस्थळं नको होते

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला अमित शाह यांचा फोन आला. त्यावेळी ते मला म्हणाले की तुम्हाला उपमुख्यमंत्री व्हावं लागेल. तुम्ही सरकारच्या बाहेर राहून चालणार नाही. काँग्रेसच्या काळात मुख्यमंत्री असला तरी त्यावर बाहेरून नियंत्रण ठेवलं जायचं. अर्थात दोन शक्तीस्थळे असायची. यावरून आपण काँग्रेसवर टीका करत आलो आहोत. मग आपण तशा पद्धतीने काम करणे उचित होणार नाही. त्यामुळे तुम्ही सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घ्या, जेणेकरून दोन शक्तीस्थळे होणार नाही, असं शहा यांनी म्हटल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Three-Language Policy : सीबीएसईच्या त्रिभाषा धोरणाला मुदतवाढ? सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची सूचना, अंमलबजावणी 2027-28 पर्यंत ढकलण्याची शक्यता

Mumbai-Pune Highway Traffic : ठाणे-मुंबईकडे जाणार्‍या वाहनांसाठी मोठी बातमी! महामार्ग पोलिसांकडून 'या' दिवशी अवजड वाहनांना प्रवेशबंदी, प्रवासाच्या नियोजनापूर्वी वाचा ही अपडेट

Central Railway: खोपोलीकरांसाठी लोकलला 'ब्रेक'! पळसदरी-खोपोलीदरम्यान दोन महिने विशेष ब्लॉक, पाहा वेळापत्रक

Latest Marathi News Update : पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणी आरोपी सैफुल्ला उर्फ ​​साजिद जट्ट याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

Raigad Teacher Recruitment: रायगड ZP शिक्षक भरतीत सहा तालुके पूर्णपणे वगळले; शून्य शिक्षकी शाळांचा प्रश्न अधिक गंभीर

SCROLL FOR NEXT