Devendra Fadnavis  
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis: शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार; फडणवीसांनी सांगितलं

रुपेश नामदास

तुळजापूर: आई तुळजाभवानीने शक्ती दिल्यास लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. फडणवीस यांनी शुक्रवारी तुळजाभवानी मातेचे दश॔न घेतले.

संबळच्या ठेक्यावर फडणवीस यांना मंदिरात नेण्यात आले. महाद्वारात क्रेनच्या साहाय्याने मोठा हार घालून फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.

‘तुळजाभवानी मातेने जनसामान्यांची कामे करण्यासाठी शक्ती द्यावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवीचे उपासक आहेत. त्यांनाही देश चालविण्यासाठी शक्ती द्यावी,’ असे साकडे घातल्याचे ते म्हणाले. ‘‘सोलापूर- तुळजापूर- धाराशिव रेल्वेमार्गासाठी ४५० कोटी रुपये आपण दिले आहेत. त्यामुळे रेल्वे संघर्ष समितीने २० वर्षे केलेला संघर्ष आता संपला आहे.

केंद्र-राज्य शासनाच्या निधीतून तुळजाभवानी मंदिर परिसरात विकास करायचा आहे. त्यानुसार प्रयत्न सुरू आहेत. तुळजापूर नगरपालिकेला यात्रा अनुदान वाढवून देण्याबाबत सकारात्मक आहोत,’’ असे त्यांनी सांगितले. लोकसभेच्या धाराशिव मतदारसंघावर शिवसेना दावा करीत असल्याचे विचारल्यावर, यासंदर्भात भाजपची केंद्रीय समिती निण॔य घेईल, असे ते म्हणाले.

भाविकांसाठी मार्गात बदल

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना घाटशीळ मार्गे बीडकर पायऱ्या मार्ग मंदिरात प्रवेश देण्यात आला होता. त्यामुळे काहीकाळ भाविकांची गैरसोय झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT