fadnvis 
महाराष्ट्र बातम्या

राणा दाम्पत्याच्या अटकेवर फडणवीसाचं ट्विट; म्हणाले, लोकशाहीचे गार्‍हाणं...

दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण केल्याप्रकरणी राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याला खार पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेनंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलं असून लोकशाहीचं गाऱ्हाणं गाणारे आज सोयीस्कर गप्प का? असा सवाल केला आहे. (Devendra Fadnavis tweet on Rana couple arrest)

फडणवीस ट्विटमध्ये म्हणतात, महाराष्ट्रातील घटना व्यथीत करणार्‍या आहेत. भाजपाच्या पोलखोल रथावर हल्ले झाले तरी यातील आरोपींना अटक नाही. मोहित कंबोज यांच्यावर हल्ला झाला तरी याप्रकरणी साधा गुन्हा दाखल नाही. महिला लोकप्रतिनिधीला 20 फूट गाडण्याची भाषा केली गेली याची साधी दखल सुद्धा घेतली नाही. हनुमान चालिसा पठणाला राणा दाम्पत्य आले तर त्यांना थेट अटक करण्यात आली.

इतकी दंडुकेशाही? इतका अहंकार? इतका द्वेष? सत्तेचा इतका माज? सरकारचं करणार हिंसाचार एवढीच तुमची मदुर्मकी? सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या. पण, जनता सारं काही पाहतं आहे. निव्वळ लज्जास्पद. लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार संपला का? लोकशाहीचं गार्‍हाणं गाणारे आज सोयीस्कर गप्प का आहेत? असे अनेक सवालही फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना उपस्थित केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

SCROLL FOR NEXT