Devendra Fadnavis attacks Uddhav Thackeray Devendra Fadnavis attacks Uddhav Thackeray
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis: शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीवर देवेंद्र फडणवीसांची एका वाक्यात प्रतिक्रिया...

कालच शिवसेना - संभाजी ब्रिगेडच्या युतीची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेतल्या अभूतपूर्व बंडानंतर सेनेला मोठा धक्का बसला आहे. या धक्क्यातून सावरण्यासाठी आता आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरेही कामाला लागले आहेत. संजय राऊतांच्या कोठडीमुळे शिवसेना आणखी कोंडीत सापडली आहे. अशातच त्यांच्या संभाजी ब्रिगेडसोबतच्या युतीच्या घोषणेमुळे राजकीय पक्षांतून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना संभाजी ब्रिगेड युतीबद्दल विचारणा केली असता, फडणवीसांनी आपण केवळ एका वाक्यात उत्तर देणार असं सांगितलं. विनाशकाले विपरीत बुद्धी अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी यावर दिली आहे.

शिवसेनेतल्या बंडानंतर पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी सध्या उद्धव आणि आदित्य ठाकरेंकडून प्रयत्न सुरू आहे. अशातच उद्धव ठाकरेंनी काल संभाजी ब्रिगेडसोबत युती करण्याची घोषणा केली. त्यानंतर राज्याच्या राजकारणातून विविध प्रतिक्रिया उमटत आहे. प्रादेशिक अस्मिता आणि संविधानासाठी आपण ही युती केली असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT