Devendra Fadnavis Marathi News
Devendra Fadnavis Marathi News Devendra Fadnavis Marathi News
महाराष्ट्र

उपमुख्यमंत्र्यांच्या महाविकास आघाडीवर हल्ला; म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

शिरदोण : मागील अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार होते. मात्र, या सरकारला काही कराव असं वाटल नाही. किंवा त्यांची इच्छा झाली नाही. मात्र, त्याबद्दल मला काही बोलायचे नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील ठाकरे सरकारवर हल्ला केला.

सातारा जिल्ह्यातील शिरढोण येथे वासुदेव बळवंत फडके यांच्या नूतनीकृत वाळ्याचे लोकार्पण करण्यासाठी आले असता देवेंद्र फडणवीस बोलत होते. वासुदेव बळवंत फडके यांच्या वाड्याचे दर्शन घेण्याची संधी मिळाली याला मी भाग्य समजतो, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

वासुदेव बळवंत फडके यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांनी इंग्रजांविरुद्ध असंतोष तयार केला होता. सशस्त्र क्रांतीचे बीजारोपण केले होते. आज आद्य क्रांतिकारकाच्या स्मारकाचे लोकार्पण होत आहे. १८५७ च्या उठावानंतर क्रांतीची ज्योत संपेल अशी अवस्था निर्णाण झाली होती. मात्र, सशक्त क्रांती करून बीजारोपण केले जाऊ शकते, असे दाखवून दिले. तसेच इंग्रजांविरुद्ध फळी उभारली, असेही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

लोकांमध्ये ऊर्जा तयार करण्याचे काम वासुदेव बळवंत फडके यांनी केली, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. एमएमआरडीएचा (MMRDA) निधी मिळावा यासाठी स्वतः प्रयत्न करेल, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

RCB vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

Mallikarjun Kharge : ''राज्यात 'मविआ'ला कमीत कमी ४६ जागा मिळतील'' खर्गेंचा दावा; इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

Pune-Delhi Flight : विमानाला धडक, चौकशीसाठी पथक;‘डीजीसीए’चे तीन सदस्य पुण्यात दाखल

VIDEO: "निवडणूक संपली, प्रचार संपला!"; रितेश आणि जिनिलियाचा व्हिडीओ पाहून खळखळून हसाल

SCROLL FOR NEXT