Sharad Pawar Reaction After ED interrogation to Nawab Malik
Sharad Pawar Reaction After ED interrogation to Nawab Malik  esakal
महाराष्ट्र

125 तास रेकॉर्डिंग करु शकणाऱ्या फडणवीसांचं कौतुक करायला पाहिजे: शरद पवार

सकाळ डिजिटल टीम

काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळामध्ये पेन ड्राईव्ह सादर करुन 125 तासांचं रेकॉर्डींग दिलं आहे. यामध्ये त्यांनी विशेष सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण यांचे अनेक व्हिडिओ असलेले पेन ड्राइव्ह अध्याक्षांकडे सोपवण्यात आले आहेत. या माध्यमातून त्यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

आता पेन ड्राईव्हवर प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आपलं सविस्तर मत मांडत भाजपला चिमटे काढले आहेत. सरकार गेल्यामुळे भाजप अस्वस्थ झालंय. मात्र, मला त्यांच्या आरोपांचा काही भाग समजला नाही. आरोपांच्या खोलात मी अद्याप गेलो नाहीये. मात्र, सत्ताधाऱ्यांना नाउमेद करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. केंद्र सरकारच्या सगळ्या एजन्सीज या फडणवीसांच्या विचारांच्या लोकांच्या हातात आहेत. त्यामुळे भाजप या यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचं स्पष्ट असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसेच या 125 तासांच्या रेकॉर्डिंग करण्याची क्षमता त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी फडणवीसांचं कौतुक केलं आहे.

शरद पवार यांनी म्हटलंय की, 125 तासांचं रेकॉर्डिंग करण्यासाठी देवेंद्र फडणवीस अथवा त्यांचे कुणीतरी सहकारी यशस्वी झाले आहेत, त्याबद्दल त्यांचं कौतुक करायला हवं. 125 तास रेकॉर्डिंग करायचं काम केलं जर असेल तर त्यासाठी तशा शक्तीशाली एजन्सीजचा वापर केल्याची शक्यता नाकारता येत नाहीत. अशा एजन्सीज फक्त भारत सरकारकडे असल्याने त्यांचा वापर झालेला असू शकतो. हे सिद्ध व्हायला हवं यासाठी राज्य सरकार नक्कीच तपास करेल. त्यात माझंही नाव घेतलेलं दिसतंय. माझंही कुणाशी चर्चा झालेली नाहीये.

पुढे ते म्हणाले की, 125 तासांचं रेकॉर्डींग केलंय म्हणजे किती तयारी केली असेल ते बघा. मात्र, सार्वजनिक जीवनातील व्यक्तीबाबत तक्रार करताना त्याची शहानिशा करायला हवी. कुणीतरी तक्रार करायची आणि त्यानंतर लोकप्रतिनीधींवर यंत्रणांनी तपासणी करायची. विशेषत: महाराष्ट्र आणि बंगालमध्ये हे प्रकार अधिक आहेत. उदाहरण, अनिल देशमुख यांच्या प्रकरणामध्ये आधीच्या पोलिस अधिकाऱ्याने तक्रार केली. त्यानंतर देशमुखांना जेलमध्ये जावं लागलं. सत्तेचा गैरवापर करुन चौकशी कशी केली जाते, याचं चांगलं उदाहरण ते आहेत. त्यांच्या जवळच्या 95 लोकांना आणि 200 लोकांशी चौकशी केली. जवळपास 90 छापे एका व्यक्तीच्या संबंधात टाकण्यात आल्याचं प्रशासनामध्ये असं कधी मी ऐकलं नव्हतं. एवढे छापे टाकूनही काही साध्य होत नसताना आणखी त्रास कशापद्धतीने देता येईल, याचे मार्ग शोधण्यात आलं.

नवाब मलिकांबाबतची केस किती जुनी आहे? तरी ती उकरून काढण्यात आली. याबाबत राज्य सरकार आणि गृहखाते चौकशी करेल, असा मला विश्वास आहे. पुरेपुर गैरवापर करु शासन अस्थिर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. संजय राऊत यांनी सविस्तर माहिती आणि अनुभव पंतप्रधानांना कळवला आहे. त्याला आवर घालण्याची खबरदारी घेतील. पुढे त्यांनी म्हटलंय की, या सरकारला कुणीही धक्का लावू शकत नाही. आमच्याकडे बहुमत आहे. मात्र, अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु आहे हे नक्की!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT