Jayant Patil Esakal
महाराष्ट्र बातम्या

Jayant Patil: देवेंद्र फडणवीस घेणार जयंत पाटलांची विकेट! पक्का समर्थक होणार कट्टर विरोधक?

जयंत पाटलांचा देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर टिकाव लागणार का हे पाहणं महत्वाचं

अक्षता पांढरे

Maharashtra Politics : जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, शरद पवारांचे एकदम खास, एवढे की अजित पवारांनी बंड केलं, भल्या भल्या आणि जून्या साथीदारांनी शरद पवारांची साथ सोडली तरी जयंतराव मात्र साहेबांसोबत राहिले आणि त्यांची महत्वाची ओळख म्हणजे इस्लामपुर विधानसभा मतदारसंघाचे सगल ७ टर्मचे आमदार.

कित्येक सरकारं आली गेली, मोदींची लाट आली तरी जयंत पाटील आणि इस्लामपुरचा गड हे समीकरण आजही कायम आहे. एवढंच काय पाटलांना कोंडीत आणण्यासाठी ईडीची पिडा पण लावली, तर जयंत पाटलांचा बालेकिल्ला कायम राहिला. त्यामुळे विरोधकांचा इस्लापुरमध्ये टिकाव लागणं अवघडं आहे. यात सगळ्यात जयंत पाटील भाजपमध्ये जाणार अशा वावड्या उठवल्या गेल्या, ते ही तारखांसकट, पण तरी जयंत पाटील राष्ट्रवादीसोबत कायम राहिले. शेवटी अजितदादा मोठ्या संख्येंने आमदार घेऊन बाजूला गेले. पण तरी जयंत पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडली नाही. एकूण काय जयंत पाटलांची कोंडी करण्याची प्रत्येक चाल फेल ठरली.

पण आता जयंत पाटलांची विकेट घेण्यासाठी स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आपली चाल खेळलीये आणि जयंत पाटील यांच्यासमोर त्यांचाच एकेकाळचा सर्मथक मैदानात उभा केलाय आणि हा सर्मथक म्हणजे निशीकांत भोसले. भाजपने निशीकांत भोसले यांची सांगली जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे. त्यामुळे इस्लामपुरच्या विधानसभा निवडणूकीत जयंत पाटलांच्या विरोधात भोसले तगडे उमेदवार म्हणून दिसणार असल्याचं बोललं जात आहे.

निशीकांत भोसले हे एकेकाळी जयंत पाटलांचे खास म्हणून ओळखले जायचे. जवळपास २१- २२ वर्ष दोघांनी एकत्र राजकारण केलं. पण काही कारणास्तव त्यांच्यात दुरावा आला आणि सर्मथक कट्टर विरोधक बनले. म्हणजे २०१६ ची इस्लामपुर नगरपरिषद निवडणूक जयंत पाटलांना कधीच विसरता येणार नाही, अशी ठरली. जयंत पाटलांना फाईट देत भोसले नगराध्यक्ष बनले. जयंत पाटलांची नगरपरिषेवरची ३१ वर्षांची सत्ता निशिकांत भोसलेंनी उलथुन लावली.

त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे २०१७ ला निशीकांत भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि पक्षानेही सुद्धा त्यांच्यावर इस्लामपुरची जबाबदारी दिली. पण त्यावेळच्या शिवसेना भाजप युतीत ही जागा गेली शिवसेनेला. त्यामुळे तिकीट जरी मिळालं नसलं तरी भोसलेंनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. आता या ठिकाणी जयंत पाटील जरी निवडून आले तरी निशिकांत भोसले हे मतदानाच्या आकडेवारी २ नंबरवर होते.

जयंत पाटलांना 115,563 मतं होती तर भोसलेंना 43,394 मतं होती. त्यामुळे आता भोसलेंना जयंत पाटलांविरूद्ध येत्या विधानसभा निवडणूकीत लढ म्हणत भाजप त्यांची कोंडी करण्याच्या प्रयत्नात आहे आणि त्यात भोसलेंना फडणवीसांसोबत शिंदे आणि अजित पवारांची देखील साथ मिळाली तर पाटलांची आमदरकी सुद्धा धोक्यात येण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT