ठाकरेंची टीका, फडणवीसांचं प्रत्युत्तर esakal
महाराष्ट्र बातम्या

उद्धव ठाकरेंनी कारशेडवरून केलेल्या टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर; म्हणाले, आम्ही आदर...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटच्या बैठकीत शिंदे सरकारने ठाकरे सरकारचा मुंबईतील मेट्रो कारशेडचा निर्णय बदलून तो पुन्हा आरेमध्ये करण्याला मान्यता दिली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत टीका केली. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

शिंदे सरकारने बदललेल्या निर्णयावर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. तसेच सरकारला भावनिक आवाहनही केलं होतं. उद्धव म्हणाले होते, आज पहिल्यांदा तुम्हाला माझा चेहरा पडलेला दिसत असेल. कारण मला आज खरंच दुःख झालेलं आहे. माझ्यावर राग आहे ना, तर माझ्यावर राग काढा, माझ्या पाठीत वार करा. पण मुंबईच्या काळजात कट्यार घुसवू नका. माझा राग मुंबईवरती काढू नका. आरेचा निर्णय नव्या सरकारनं बदलला याचं मला खरोखर दुःख झालेलं आहे.

आरे हा कोणाचा खासगी प्लॉट नाही. तिकडे कुठल्याही बिल्डरला आपण आंदन दिलेलं नाही. पर्यावरणासाठी आवश्यक असलेली वनराई होती, त्यावर एका रात्रीत झाडांची कत्तल झाली. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आरे कारशेडला स्थगिती दिली. त्यासाठी मी कांजूरमार्गचा पर्याय दिला होता. मी पर्यावरणाच्या सोबत होतो. ज्यावेळेस संभ्रम निर्माण होतो तेव्हा हा विषय टाळलेला बरा. त्यामुळं माझी हात जोडून विनंती आहे, की माझ्यावरचा राग मुंबईवरती काढू नका. मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका."

यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की, आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. उद्धव ठाकरे यांचा आदरच आहे. शिवाय मुंबईकरांचे हित लक्षात घेऊनच निर्णय घेऊ, असंही फडणवीस यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Banerjee Attack : अभिषेक बॅनर्जींवर जीवघेणा हल्ला; विटा-दगडं फेकत डोळे आणि छातीवर वार, ममता बॅनर्जींचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाल्या, सत्ताधारी खुनी...

Pune News: हिंजवडीतील IT कंपनी अचानक बंद? पगार नाही, चेक बाऊन्स... ७०० इंटर्न आणि कर्मचाऱ्यांचा वेतन घोटाळा उघड

Hero New Bike : पेट्रोल पंपावर जायचं विसरा! लॉन्च झाली Hero ची दमदार बाइक; 72km मायलेजसह जबरदस्त स्मार्ट फीचर्स, किंमत फक्त...

Gokul Politics : बंटी पाटलांना टक्कर देण्यासाठी महायुतीचा 'मास्टरस्ट्रोक'! 'गोकुळ'साठी कोरेंची मध्यस्थी अन् चंद्रकांतदादांनी काढला तोडगा, गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?

Akola RSS Office Attack Case: आरएसएस कार्यालय हल्ला प्रकरणात आमदार साजिद खान पठाण यांच्यासह १२ जणांची १६ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT