devendra fadnvis on cm uddhav thackeray answer to pm modi on fuel price hike in Maharashtra  
महाराष्ट्र बातम्या

"नफेखोरीची ‘पोलखोल’ करताच तुमचे.."; CM ठाकरेंवर फडणवीसांची टीका

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या कोरोनाविषयक घेतलेल्या बैठकीत पेट्रोल-डिझेलवरील कराचा मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारनं व्हॅट कमी न केल्यानंच महाराष्ट्रातील जनतेला त्रास सहन करावा लागत आहे, असा आरोप केल्यानंतर याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चोख उत्तर दिलं होतं. यामध्ये ठाकरेंनी देशाच्या विकासात सर्वात मोठे योगदान देणाऱ्या राज्याला आर्थिक बाबतीत केंद्राकडून सापत्न वागणूक दिली जात आहे असे म्हटले होते. दरम्यान या उत्तरावर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टिका केली आहे.

फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे मुद्दे खोडून काढत माहाराष्ट्रातील जनतेला इंधन दरात दिलासा देण्याची मागणी केली. तसेच दोषारोप आणि जबाबदारी झटकणे! यापेक्षा दुसरे काही करणार तरी आहात का? असे सवालही त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत, "मुद्दा पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचा आणि तुम्ही जीएसटीचा विषय घेऊन बसलात. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी महाराष्ट्राच्या नफेखोरीची ‘पोलखोल’ करताच तुमचे अरण्यरुदन सुरू!", अशा शब्दात खोचक टीका केली आहे.

फडणवीस पुढे म्हणाले की, "जीएसटीचा निधी राज्याला नियमित मिळतच असतो, जुनीही थकबाकी मिळाली आणि उरलेली देण्याची मुदत जुलै 2022. मग जीएसटीची थकबाकी मिळाल्यानंतर पेट्रोल-डिझेलवर आकारलेला अतिरिक्त कर ग्राहकांना परत करणार का? असा सवाल देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.

"शेजारच्या दीव-दमणमध्ये 103 रुपयांत पेट्रोल मिळते, तर महाराष्ट्रात 120 रुपयांना का? याचे उत्तर मिळालेच पाहिजे आणि दुसरे म्हणजे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आवाहनाचा आदर करीत महाराष्ट्रातील जनतेला, मराठी माणसाला तत्काळ दिलासा द्या!" अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : कर्जाच्या पैशातून मोदींचा केक कापणार? वाढदिवस साजरा करणे म्हणजे आर्थिक गुन्हा, संजय राऊतांचे राज्य सरकारवर ताशेरे

Latest Marathi News Updates : कांद्याचे दर घसरले, शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

जरा आवरा अन् Google Gemini ला स्वत:चे पर्सनल फोटो देण्यापूर्वी ही बातमी वाचा... नाहीतर वेळ निघून जाईल, तज्ज्ञांचा इशारा

कलाकार हवा तर असा ! दशावतारचं यश पाहून हिंदी मीडियाने केलं दिलीप प्रभावळकरांचं कौतुक "बॉलीवूडला लाज वाटायला.."

Rahuri Accident: 'दुचाकींच्या अपघातात एक ठार, एक जखमी'; दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर भीषण धडक

SCROLL FOR NEXT