muktidham.jpg 
महाराष्ट्र बातम्या

येथे घडते अनेक देवी-देवतांच्या दर्शनाची अनुभूती!

किशोरी वाघ : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक शहराच्या नाशिक रोड उपनगरीत वसलेले एक लोकप्रिय पर्यटन व आकर्षण केंद्र म्हणजे मुक्तिधाम..हे एक संगमरवरी मंदिर असून ज्यामध्ये विविध हिंदू देवी-देवतांच्या प्रतिकृती आहेत. विशेष म्हणजे बाराही ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती या ठिकाणी आहेत, जी मूळ देवस्थानांप्रमाणे साकार करण्यात आली आहेत . तसेच त्यांना संबंधित तीर्थक्षेत्रांमध्ये पाठवून पवित्र मंत्रोच्चार करून येथे ठेवण्यात आली आहेत. 

मंदिराच्या भिंतींवर गीतेचे अठरा अध्यायही

मुक्तिधाम संकुलात श्रीकृष्णाला समर्पित एक मंदिरही आहे. या मंदिराच्या भिंतींवर कृष्ण आणि महाभारत यांच्या जीवनातील दृश्ये दर्शविणारी चित्रे आहेत. याची माहिती मिळावी म्हणून मुक्तिधामचे संस्थापक जयरामभाई चौहान यांनी यांनी ही संकल्पना राबविली आहे. भिंतींवर गीतेचे अठरा अध्यायही पाहायला मिळतात. हे मंदिर राजस्थानाच्या मकराना येथून, आणि राजस्थानी शिल्पकारांनी संगमरवरी बनविले आहे. सर्व बारा ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृतींबरोबरच, श्रीकृष्णाचे मंदिर येथे विष्णू , लक्ष्मी राम , लक्ष्मण , सीता , हनुमान , दुर्गा , गणेश यांसारख्या सर्व प्रमुख हिंदू देवता आणि देवींच्या मूर्ती देखील आहेत. कुंभमेळ्याच्या वेळी हजारो हिंदू भाविक मुक्तिधाम मंदिरात येतात. 

संगमरवरी मंदिर असून विविध हिंदू देवी-देवतांच्या प्रतिकृती

मुक्तिधाम मंदिर नाशिक शहरापासून सुमारे ८ किमी अंतरावर एक प्रसिद्ध मंदिर आहे. मंदिर सुंदर शुध्द पांढऱ्या स्वरूपात बांधले आहे. हे श्री जयराम भाई बिटको यांनी तयार केले आहे. पवित्र मंदिराची रचना वेगळी व अपरंपरागत आहे. हे एका ट्रस्टद्वारे खासगीरित्या चालविले जाते 

आख्यायिका अशी आहे की...
नाशिकरोड येथील मुक्तीधाम या धार्मिक स्थळाची अशी आख्यायिका आहे की, येथे प्रभू रामचंद्र सीता आणि लक्ष्मण हे तिघे प्रवासादरम्यान तेथे थांबले होते त्यानंतर तिकडून ते पंचवटीला गेले. या मंदिरात दर्शन घेतल्या नंतर साक्षात चारीधामचे दर्शन होते अशी मान्यता आहे. या मंदिराची स्थापना १९७१ मध्ये झाली असून, देशभरासह इतर देशातून देखील भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. 

मंदिर बघतांना कोणाचेही मन भारावून जाईल

वैकुंठधाम, भद्रीनाथधम, कार्तिक स्वामी मंदिर, नवनाथ दरबार, सत्यनारायण भगवान, संत जलाराम बाप्पा, दत्त, महालक्ष्मी मंदिर, दुर्गामंदिर, जोतिर्लिंग, काशी विश्वनाथ, कृष्ण मंदिर, राम मंदिर, विष्णुमंदिर, हनुमान मंदिर यासह आणखी देवांची मंदिर येथे बघायला मिळतात. तसेच, रामनवमी, कार्तिक स्वामींची जयंती, गोकुळाष्टमी, हनुमान जयंती, महाशिवरात्री, नवरात्री, गणेश चतुर्थी या विशेष दिवशी येथे यात्रा देखील असते. संगमरवरी दगडात बांधलेलं हे मंदिर बघतांना कोणाचेही मन भारावून जाईल असेच आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT